शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्टीनिमित्त ‘एसटी’च्या आरक्षणासाठी लगबग : पुणे विभागात १५० जादा बस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:50 IST

शाळांच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. तर महाविद्यालयांच्या परीक्षाही आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबहुतेक बसचे ५० ते ५५ टक्के बसचे आरक्षण

पुणे :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून उन्हाळी सुट्टीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागातील सुमारे १५० जादा गाड्यांचे ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे. पुढील आठवडाभरात आरक्षणाचे प्रमाणे वेगाने वाढेल, अशी माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. शाळांच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. तर महाविद्यालयांच्या परीक्षाही आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. बहुतेक शाळांचे निकाल दि. ३० एप्रिल रोजी असतात. त्यामुळे दि. १ मेपासून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यासाठी प्रामुख्याने एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी पुणे विभागाने सुमारे १५० जादा बसचे नियोजन केले आहे. दि. १३ एप्रिलपासूनच नियोजन करण्यात आले असले तरी दि. २२ व २३ एप्रिल आणि दि. २८ व २९ एप्रिल रोजी निवडणुक कामासाठी बस द्याव्या लागणार असल्याने एसटी प्रशासन यामध्ये व्यस्त होते. आता एक टप्पा झाला असून दुसरा टप्पाही चार दिवसात संपले. त्यामुळे एसटीकडे सर्व बस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत जादा बसचे ५० ते ५५ टक्के आरक्षण झाले आहे. प्रामुख्याने मराठवाडा भागात जाणाऱ्या बसला प्रतिसाद मिळत आहे. मावळ व शिरूर मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आरक्षण वाढत जाईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील १३ बसस्थानकांवरून जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या बसस्थानकांवर उपलब्ध प्रवाशांची संख्या पाहून बस वाढविल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.-----------------  बस स्थानकनिहाय जादा गाड्या  शिवाजीनगर - जालना, बीड, धुळे, लातूर, मालेगाव, अकोला  स्वारगेट - तुळजापुर, बिदर, विजापुर, गुलबर्गा, गाणगापुर, पंढरपुर, दापोली  पिंपरी चिंचवड - लातुर, बीड, कोल्हापूर, सोलापूर, दापोली  सासवड - पंढरपुर, सातारा, नाशिक, औरंगाबाद  बारामती - औरंगाबाद, बीड, शिर्डी, सोलापुर, पंढरपुर, सातारा, दादर  एमआयडीसी - लातूर, बीड  तळेगाव - शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, तुळजापुर  नारायणगाव - संगमनेर, नाशिक, शिर्डी, बार्शी, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर.  राजगुरूनगर - पैठण, धुळे, बार्शी, बीड.  शिरूर - औरंगाबाद, तुळजापुर, जालना, बीड  इंदापूर - धारूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, तुळजापुर, इचलकरंजी, परळी  दौंड - जळगाव, कोल्हापुर, औरंगाबाद  भोर - औरंगाबाद, नाशिक, पंढरपुर, महाड, कोल्हापूर  ----------------        

टॅग्स :PuneपुणेSummer Specialसमर स्पेशलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स