पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे विभागीय मराठीसाहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी गुहागरला होणार आहे. मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. तीन दिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात १४ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडीने होणार आहे. सायंकाळी स्थानिकांचे कविसंमेलन होणार असून ‘कोकणी लोककला’ या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना, मंगळागौर, पालखीनृत्य, कोळीनृत्य, शेतकरीनृत्य आणि नमन या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. १५ डिसेंबरला सकाळी ‘लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’, ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या विषयावरील चर्चांचा समावेश आहे. त्यानंतर कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे घेणार आहेत. रात्री प्रसिद्ध निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. पुल, गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘काव्य नव्हे, हा अमृतसंचय’ हा विशेष कार्यक्रम चैत्राली अभ्यंकर आणि सहकारी सादर करणार आहेत. १६ डिसेंबर रोजी सकाळी ‘आमची बोली, आमची भाषा’ या विषयावरील परिसंवाद पार पडेल. त्यानंतर सकाळी नियोजित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारी हास्य कवी संमेलन, तर सायंकाळी ‘कारगील विजय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ------------ संमेलनाची वैशिष्टये१. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने निघणार ग्रंथदिंडी२. गणेशवंदना, मंगळागौर, पालखीनृत्य,कोळीनृत्य, शेतकरीनृत्य, नमन या कोकणी लोककलांचे होणार सादरीकरण३. ‘रत्नाकर’ या स्मरणिकेचे प्रकाशन
गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 15:51 IST
मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर
ठळक मुद्देविभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी गणेश वंदना, पालखीनृत्य, कोळीनृत्य, शेतकरीनृत्य आणि नमन या लोककलांचे सादरीकरण होणार नियोजित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत होणार