शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Aashadhi Wari: संत गोरोबा काका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:52 IST

आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हा तालुक्यातील संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले...

नसरापूर (पुणे) : महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हा तालुक्यातील संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. यावेळी नसरापूर - माळेगाव येथील ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजय आठवले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नसरापूर येथे पालखीचे स्वागत केले. 

या पालखी सोहळ्यात आठवलेचे विद्यालयाचे ' चिमुकले वारकरी वेशात 'या सोहळ्यात सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण वि नेद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत मुक्ताई, संत मीरा या संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यांनी उपस्थित पालक, ग्रामस्थ यांचे लक्ष वेधले. वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभागी झाले होते. 

शिवस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याची पहिली राजधानी राहिलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्यापासून संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात नसरापूरपासून वेल्हा परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने महिलांची संख्या उल्लेखनीय होती. नसरापूर (ता.भोर)येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नसरापूर बाजारपेठेतून पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना नसरापूर गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वारीतील सहभागी वारकऱ्यांना फराळाचे वाटप करीत वारीच्या प्रवासात असणाऱ्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022