शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकाही महापालिकेच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:41 IST

प्राथमिक शिक्षकांपेक्षा कामाची वेळ फक्त एका तासाने व ती ही कागदोपत्री कमी असल्याने त्यांची सेवा अर्धवेळ समजली जाते.

ठळक मुद्देतुटपुंजे वेतन : महापालिकेत आंदोलनाचा निर्धार नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंगणवाडी सेविकांना ११००० ते १५००० हजार रुपये मानधन

पुणे : महापालिकेच्या अंगणवाडी शिक्षिका व सेविकांमध्ये अपुऱ्या वेतनावरून असंतोष निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षकांपेक्षा कामाची वेळ फक्त एका तासाने व ती ही कागदोपत्री कमी असल्याने त्यांची सेवा अर्धवेळ समजली जाते. तरीही अन्य महापालिकांमधील शिक्षिका व अंगणवाडी सेविकांपेक्षा कमी वेतनावर त्यांना काम करावे लागत आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये महापालिकेच्या अंगणवाड्या आहेत. मराठी, इंग्रजी, कन्नड अशा विविध भाषांमध्ये त्या चालवल्या जातात. एकूण ३१२ अंगणवाड्यांमध्ये ९३८ शिक्षिका व सेविका आहेत. मराठी माध्यमात २५५ शिक्षिका व २४२ सेविका आहेत. इंग्रजीसाठी १७५ शिक्षिका व १६८ सेविका आहेत. उर्दुसाठी ६२ शिक्षिका व १२ सेविका तर कन्नडसाठी १ शिक्षिका व १ सेविका आहे. बहुसंख्य अंगणवाड्या शहरातील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये आहेत. त्यात येणारी मुले कष्टकरी, ज्यांचे आईवडिल दोघेही काम करतात अशा घरांमधील आहेत. शिक्षिका व सेविका अशा दोघांनाही या मुलांसाठी बराच वेळ द्यावा लागतो. वेळप्रसंगी मुले आली नाहीत तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आणावे लागते, त्यांची देखभाल करावी लागते.त्यासाठी महापालिकेकडून शिक्षिकांना ८ हजार ५०० तर सेविकांना ६ हजार २०० असे वेतन दिले जाते. त्यात वाढ व्हावी अशी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यापूर्वी अंगणवाड्यांचे कामकाज शिक्षण मंडळाकडून चालत होते. सन २०१७ मध्ये शिक्षण मंडळ विसर्जित करण्यात आले. त्यामुळे आता थेट महापालिकेकडून अंगणवाड्यांचे काम पाहिले जाते. पूर्वी मंडळाकडून मागण्यांची किमान दखल घेतली जात असे, आता मात्र महापालिका प्रशासन काहीच ऐकायला तयार नाही असे संघटनेचे म्हणणे आहे. महापालिका युनियनच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका प्रशासनाबरोबर संपर्क साधत असतात, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या कामाची वेळ ६ तास आहे तर अंगणवाडी शिक्षिका व सेविका यांच्या कामाची वेळ ५ तास आहे. त्यामुळे त्यांना अर्ध वेळ समजले जाते व कमी वेतनावर भरपूर काम करून घेतले जाते. वसाहतींमधील मुलांना शोधणे, त्यांना अंगणवाडीत आणून बसवणे, शिकवणे त्याशिवाय वेळोवेळी महापालिका प्रशासनाने सांगितलेली जनगणना व निवडणुकविषयक कामे करणे ही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. त्यामध्ये ५ तासांपेक्षा कितीजरी जास्त वेळ जातो. राज्यातील ठाणे, मिराभाईंदर, खोपोली, इचलकरंजी याठिकाणी बालवाडी शिक्षिका व सेविका यांना वेतनश्रेणी दिली जाते. नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ११००० ते १५००० हजार रुपये मानधन दिले जाते अशी माहिती काही अंगणवाडी सेविकांनी दिली. त्याप्रमाणे वेतन मिळावे, अशी शिक्षिका व सेविका यांची मागणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका