शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आमदार महेश लांडगेंपुढे नांगी टाकली आढळरावांनी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:23 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी भोसरीचे भाजपा सहयोगी आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी केली होती.

ठळक मुद्देगैरव्यवहाराचे आरोप घेणार माघार२००८ च्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वेस्ट टू एनर्जी आणि समाविष्ट गावांतील विकासकामे यांवर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे भाजपाची युती होऊनही भोसरीतील भाजपा आढळरावांच्या प्रचारात सहभागी झाली नव्हती. लांडगे आणि आढळरावांतील दुरावा दूर करण्यासाठी बैठक झाली. आढळरावांनी लांडगेंपुढे हात टेकले असून, गैरव्यवहाराचे आरोप मागे घेण्यात येणार असल्याचे गुप्त बैठकीत सांगितले. आढळरावांनी टाकलेल्या नांगीची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी भोसरीचे भाजपा सहयोगी आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी केली होती. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला गेला आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी मिळाली. तर युतीबाबत झालेल्या बैठकीत आमदार लांडगे सहभागी झाले होते. मात्र, प्रचारात न सहभागी होण्याचे धोरण भाजपा नगरसेवकांनी स्वीकारले होते. तसेच नगरसेवकांबरोबर बैठकीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढळराव हे लांडगे यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर बैठक झाली. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, बाळासाहेब गव्हाणे, सारंग कामतेकर, विजय फुगे, संजय गायकवाड, महादेव गव्हाणे उपस्थित होते. या वेळी आढळराव यांनी आपले मत मांडले. गेल्या साडेचार वर्षांत भोसरीतील विविध विकासकामांबाबत केलेले आरोप आणि दिलेली पत्रे मागे घ्यावीत, रस्तेविकास, वेस्ट टू एनर्जी बाबत आरोप केले. हे सर्व आरोप आणि याबाबतची पत्रे मागे घ्यावीत, अशी मागणी केली. त्यावर आरोप आणि पत्रे माघार घेणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. चार वर्षांत झालेले आरोप-प्रत्यारोप अनावधानाने झाले आहेत. त्यामुळे झाले ते झाले. यापुढे असे होणार नाही, असेही आढळराव यांनी सांगितल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले. ................शिष्टमंडळ भेटणारशिवसेना-भाजपाच्या २००८ च्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भोसरी भाजपाला सोडण्याची मागणी बैठकीत केली. याबाबत येत्या दोन दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट शिष्टमंडळ घेणार असून, त्यामध्ये खासदारांसह भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार शरद सोनवणे आणि महेश लांडगे असणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना