शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

गावच्या राजकारणात 'आजी'ने मारली 'बाजी'

By admin | Updated: October 30, 2015 00:02 IST

ढोरे भांबुरवाडी (ता. खेड, जि. पुणे) मध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचा आनंद काही वेगळाच होता. कारण होतं ९३ वर्षांची आजीबाई निवडून आल्याचं.

राजेंद्र मांजरे,  दावडीढोरे भांबुरवाडी (ता. खेड, जि. पुणे) मध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचा आनंद काही वेगळाच होता. कारण होतं ९३ वर्षांची आजीबाई निवडून आल्याचं. नव्वदी पार केल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलेल्या या आजीबार्इंच्या गळ््यात पहिल्याच प्रयत्नांत विजयाची माळ पडली. तिची सारी नातवंडं तिला खांद्यावर घेऊन नाचली. अवघ्या गावासाठी कौतुकाचा विषय ठरलेल्या या आजीबार्इंचं नाव आहे गंगूबाई निवृत्ती भांबरे. गावात एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होती. त्यातील एका प्रभागात आजीबार्इंनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारत ३० मतांनी विजय मिळवत राजकारणाच्या पदार्पणातच यश मिळवलं. मग काय, गावानं आजीबार्इंची मिरवणूक काढली. गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली, की गावकी-भावकीचं राजकारण आलंच. विरोधकांनी एका महिला उमेदवाराला संधी दिली म्हटल्यावर आपलाही उमेदवार तुल्यबळ हवाच. मग, चर्चा करता करता नाव पुढे आलं, गंगूबाईचं.. नव्वदी पार केलेल्या एका आजीबाईचं. आज्जीला ओळखत नव्हतं, असं गावात कुणीही नव्हतं. मग काय आजीबाई उतरल्या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या आखाड्यात. त्यांनी जबरदस्त प्रचारही केला. भाषणेही दिली. आजीचा नातू भरत भांबुरे हे गेल्या वेळी गावाचे उपसरपंच राहिलेले होते. आजीबाई शिकलेल्या नाहीत, पण उपजत शहाणपण आहे. अंगठेबहाद्दर असल्या तरी माणसं ओळखण्याची हुशारी आहे. गोरगरिबांना मदत करणारी आहे.स्वभावानं चांगली आहे. आजीची स्मरणशक्ती चांगली आहे. गावातला प्रत्येक जण तिला ओळखतो आणि तीदेखील प्रत्येकाला. आजीचं कुणाशी भांडण नाही. नव्वदी पार केली, तरी आजी धडधाकट आहे. चांगलं व्यवहारज्ञानही आहे. आजही आजीबाई दररोज मंदिरात फिरून येतात. नातलगांना भेटण्यासाठी एकट्याच प्रवास करतात. लोकांनी आग्रह केला म्हणून निवडणुकीला उभी राहिले, असं प्रांजळपणाने त्या सांगतात.