शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:37 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआधार केंद्र: वैकुंठ मेहता संस्थेच्या परिसरात स्थलांतरितजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना आधारकार्ड विषयक नागरिकांच्या तक्रारी

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये फर्निचरचे काम सुरू केल्यामुळे सुमारे पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू असलेले आधार केंद्र बंद करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या केंद्रात येणे सर्वांना सोईचे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने आधार केंद्र हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.केंद्र व राज्य शासनाने स्वीकारलेल्या धोरणामुळे आधारकार्डाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाने आधारकार्ड विषयी दिलेल्या निर्णयामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या आधारकार्ड केंद्रावरील नागरिकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे.नागरिकांची गरज लक्षात घेवून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आधार केंद्र सूरू करण्यात आले होते. आता हे केंद्र वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेच्या परिसरात सुरू नागरी सुविधा केंद्र सुरू केले जाणार आहे.त्यामुळे याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र स्थलांतरित करण्यात येणार आहे,असे आधार केंद्र समन्वयक विकास भालेराव यांनी सांगितले. मात्र,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए विंग मध्ये फर्निचरचे काम सुरू आहे.मात्र,बी विंगमधील सर्व खोल्या रिकाम्या आहेत. त्यामुळे केवळ फर्निचरच्या कारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र स्थलांतरीत करणे चूकीचे आहे,अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना आधारकार्ड विषयक नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्या लागतात. त्यामुळे हे केंद्र स्थलांतरीत केले जात असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र,तक्रारी ऐकूण घेतल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे हे केंद्र स्थलांतरित करू नये,अशी मागणी नागरिक करत आहे. दरम्यान,आधार केंद्र बंद करण्यापूर्वी नागरिकांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केवळ भित्तीपत्रके चिटकवण्यात आली होती.त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.-----------------------जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुरू असलेल्या आधार केंद्राची जागा ही भूसंपादन विभागाची होती. तसेच हे केंद्र कायस्वरूपी सुरू करण्यात आले नव्हते. नागरी सुविधा केंद्रात विविध कारणांसाठी नागरिकांना यावे लागते. त्यामुळे नव्याने सुरू केलेल्या जाणा-या  वैैकुंठ मेहता संस्थेतील नागरी सुविधा केंद्राच्या शेजारीच आधार केंद्र सुरू करण्यात येईल.  - विकास भालेराव, आधार समन्व्यक अधिकारी,पुणे 

टॅग्स :PuneपुणेAdhar Cardआधार कार्ड