शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नीरेच्या ब्रिटिशकालीन पुलावरुन युवकाची उडी; दुथडी वाहणाऱ्या नदीच्या पात्रात बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 21:24 IST

सोमवारी दिवसभर नीरा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणावर पाणी वेगात वाहत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रात वीर धरणातून ४३ हजार ०८३ क्युसेक्स वेगाने पाणी वाहत होतं

लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात सोडलेले विसर्गामुळे सध्या नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी (दि. २६)  सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नीरा येथील युवकाने दुथडी भरून वाहत असलेल्या नीरा नदीमध्ये ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली. सचिन बापूराव गोरे (वय ३०) रा. नीरा वार्ड नं. ३ असे या युवकाचे नाव आहे. जेजुरी पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील यंत्रणाना माहिती दिली आहे. 

सोमवारी दिवसभर नीरा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणावर पाणी वेगात वाहत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रात वीर धरणातून ४३ हजार ०८३ क्युसेक्स वेगाने पाणी वाहत होतं. यावेळी जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या काठावरुन पाणी वाहत होते. सचिन गोरे या युवकाने दुथडी भरून वाहत असलेल्या नीरा नदीमध्ये ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली. हा तरुण नशेमध्ये असल्याचे प्रथमदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन गोरे हा नीरा नदीवरील जुन्या ब्रिटीश कालीन पुलावर आल्यानंतर कपडे काढून तो उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना अनेक तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु सर्वांकडे दुर्लक्ष करून त्याने ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली. नशेमध्ये असल्याकारणाने त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. ब्रिटिशकालीन पुलावरती पाण्याचा प्रवाहाचा वेगात असल्याकारणाने तो तरुण वाहत खाली गेला. नीरा येथील युवकांनी बरीच शोधाशोध केल्यानंतरही तो अद्याप सापडला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीसांनी घटनेची नोंद घेतली आहे. नदीपात्राच्या शेजारील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना व पुढील यंत्रणाना युवक पाण्यात वाहून गेल्याची माहिती दिल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी दिली. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे