Pune Airport News: दुबईवरून नियोजित वेळी पुण्यात आलेल्या (६ ई १४८४) या विमानालाविमानतळावर पार्किंग-बेवर जागा उपलब्ध नसल्याने तासभर हवेतच गिरट्या घालाव्या लागल्या. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री दहा वाजता दुबईवरून नियोजित वेळी विमान पुण्यात आले. परंतु याच वेळेस पार्किंग-बेवर दुसरे विमान थांबले होते.
दरम्यान, दुबईवरून आलेल्या विमानात २०० प्रवासी होते. जागा नसल्याने या प्रवाशांना विमानात ताटकळत बसून राहावे लागते. एक तासानंतर रात्री अकरा वाजता जागा मिळाल्यावर विमान खाली उतरले. त्यानंतर इमिग्रेशन आणि बॅगा घेण्यासाठी प्रवाशांना तासभर वाट पाहावी लागली.
प्रवाशांना गैरसोयीचा फटका बसल्याने मनस्ताप सहन सहावा लागला. याबाबत विमानतळ प्रशासनांच्या नियोजनाच्या अभावाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.