शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील सांगवीत घरातून निघून गेलेल्या विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:32 IST

सविता अप्पासाहेब सालगुडे रा.सांगवी असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

(बारामती)सांगवी - सांगवी (ता.बारामती)  येथील राहत्या घरातून रात्री दहा वाजल्यापासून बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली आहे.

सविता अप्पासाहेब सालगुडे (वय 42) रा.सांगवी (ता.बारामती) असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवार (दि.17) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची आत्महत्या नसून संशयास्पद घातपात केल्याची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आत्महत्येच्या घटने नंतर संतप्त नातेवाईकांच्या जमावाने संशयास्पद असलेल्या तरुणाला रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली. संशयास्पद तरुणाला नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे महिलेची आत्महत्या नसून घातपात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

मृत सविता सालगुडे या शुक्रवारी (दि.16) रोजी राहत्या घरातून रात्री बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात गवत आणायला गेलेल्या काही महिलांना सविता सालगुडे या बारामती फलटण रस्त्याच्या कडेला शिरवली हद्दीतील  शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर सांगवीतील प्रतिष्ठित नागरिक व नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी शेतात लिंबाच्या झाडाला मृत महिलेच्या गळ्याला दोरीचा फास लाऊन तिचे पाय जमिनीला टेकले होते. तर शेजारीच बांधावर चप्पल आढळून आली. त्यानंतर महिलेचा मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला होता.

सविता सालगुडे या पतीसोबत हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या.  यामुळे झालेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  . याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्यासाठी उशीर लागणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत अध्याप अस्पष्टता आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBaramatiबारामती