शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटींचा सोनेरी रंगाचा घोडा, एक कोटीची कंधारी गाय अन् मुऱ्हा रेडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 09:41 IST

‘कृषक’ च्या प्रदर्शनात दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी

बारामती : येथील  ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित  कृषक प्रदर्शनात सोनेरी रंगाचा घोडा, दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनूर गाय आकर्षण ठरले.

हैदराबादच्या  नवाब हसन बिंद्रिप यांच्या सोनेरी रंगाच्या  घोड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आणि अश्वप्रेमींची गर्दी झाली होती.  विशेष म्हणजे, या घोड्याची मालेगावच्या यात्रेत ११ कोटींची किंमत सांगितली होती. त्यामुळे प्रदर्शनातील  हा ११ कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत  आहे.

विशेष म्हणजे, मारवाडी पठड्याच्या हा घोडा असून, तो देशात एकमेव असल्याचा दावा नवाब यांनी केला आहे.  हा घोडा ८ वर्षांचा आहे, तो त्यांनी पुष्करच्या यात्रेतून खरेदी केला आहे. त्या घोड्याचा खुराक ऋतुमानानुसार वेगवेगळा असून, त्याचे डोळे आणि शरीर यांचा रंग एकसारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे. हा घोडा पाण्यासाठी गर्दी होत होती. 

दीड टनाचा कमांडो रेडा पितो रोज तूपपिंपरी सांडसचे अमित शिंदे यांचा १,५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडाही भाव खाऊन गेला. या रेड्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती. दररोज या रेड्याला ५० किलो चारा, सरकी, खोबरे पेंड, एक किलो  गावरान तूप आणि १० लिटर दुधाचा आहार आहे, तसेच नांदेडच्या लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांची १ कोटी रुपये किमतीची रामा आणि रावण नावाची लाल कंधारी जातीचे बैल शेतकऱ्यांच्या काैतुकाचा विषय ठरली, कर्नाटकच्या बन्नूर येथील दुर्मीळ दीड फूट उंचीची बन्नूर जातीची मेंढी प्रथमच पाहावयास मिळाली. ही मेंढी चेहरा वाचणारी आहे. तिला माणसांचे भाव समजतात, असे याबाबत लिंगा राजू यांनी  सांगितले . ३ फुटी पोंगनूर गाय पालनाचा बारामतीत प्रयोग यशस्वी करणारे किशोर हिंगणे यांनी  सांगितले की, मूळ आंध्राची ही गाय आहे. 

टॅग्स :Baramatiबारामती