शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

फुटबॉल आणण्यासाठी झुडपात गेलेल्या मुलीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:30 IST

पुणे : फुटबॉल खेळत असताना बॉल झुडपात गेला. ते शोधण्यासाठी झुडपात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केला. पीडित मुलगी ...

पुणे : फुटबॉल खेळत असताना बॉल झुडपात गेला. ते शोधण्यासाठी झुडपात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केला. पीडित मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती राहिल्याने ही बाब समाेर आली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुकेश कुमार मुखिया (२२, रा. डिफेन्स कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत घटनेच्या वेळी अल्पवयीन असलेली आणि सध्या अठरा वर्षे असलेल्या तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी पीडिता अल्पवयीन असताना ती मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना बॉल मैदानाशेजारील झुडपात गेला. पीडिता बॉल शोधण्यासाठी झुडपात गेली. त्यावेळी तेथे आलेला मुकेश तिच्या पाठोपाठ झुडपात गेला. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

दरम्यान, पीडिता ही गर्भवती असल्याचा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये तिने मुकेश याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्याने केलेल्या अत्याचाराने सध्या पीडिता ही २८ महिन्यांची गर्भवती असून आरोपीवर बलात्कार, तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार समोर आल्यानंतर २२ वर्षीय तरुणावर बलात्कार, तसेच पोस्कोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचे वडील लष्करात नोकरीला असून त्यांची बदली झाल्याने संपूर्ण कुटुंब बिहार येथे गेले आहे. पुढील तपास सुरू आहे.

- संजय पतंगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे

टॅग्स :Molestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळ