शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad By Election: खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही; धनंजय मुंडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 13:52 IST

राज्यातील सरकारमुळे मराठीतील अशीही बनवाबनवी आणि पळवापळवी चित्रपट सारखे आठवतात

पिंपरी : काही दिवसांपूर्वी राज्यातील कंपन्या गुजरातला पळविल्या. त्यानंतर, आम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्राने सांगितले आहे की, दुसरी कंपनी देऊ. आता देव चोरत आहेत. भीमाशंकर देवस्थानावर आसाम सरकार दावा करत आहे. उद्या विठ्ठल चोरतील, त्याबद्दल भाजपच्या मंडळीना विचारले, तर ते बोलतील. आम्ही तुम्हाला तिरुपती देऊ. त्यामुळे अशा खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे सोमवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता तथा आमदार भास्कर जाधव, निवडणूक प्रभारी तथा आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, युवानेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुभान अली, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सिंहासनासाठी सुरतेला लोटांगण घातले जाते आहे. राज्यातील सरकारमुळे मराठीतील अशीही बनवाबनवी आणि पळवापळवी चित्रपट सारखे आठवतात. बनवाबनवी करून सरकार आणले आणि उद्योगांची पळवापळवी सुरू केली. उद्योग ठिक होते, पण आता देवही पळवायला लागले. नऊ वर्षे सत्ता असताना हिंदू धोक्यात असल्याचे सांगून मोर्चे काढले जात आहेत, असे असेल, तर पंतप्रधानांनी नऊ वर्षे काय केले, हा प्रश्न असल्याचे मुंडे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणElectionनिवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडे