शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आसखेड रस्त्याच्या कामांसाठी ९७ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:27 IST

आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्ता : जनतेच्या दबावामुळे रस्त्यांच्या कामांना सुरुवात

आसखेड : येथील आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लवकरच या रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हायब्रीड अ‍ॅन्युईटी कार्यक्रम २०१८ या अंतर्गत १८ किलोमीटरच्या कामासाठी ९७.२६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्त्याची दुरुस्ती प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील खड्डे, धूळ व जड वाहतूक आदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र जनमताच्या दबावामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. आमदार सुरेश गोरे यांनी सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, या हायब्रीड अ‍ॅन्यूईटी कार्यक्रम योजनेत कर्ज काढताना ठेकेदारास शासन जामीनदार राहाणार या प्रक्रियेत प्रशासकीय अडचणीमुळे उशीर झाला. १५ ते २० दिवसांत काम सुरू होईल. यामध्ये आंबेठाण चौक ते भांबोली या दहा किलोमीटर चारपदरी रस्त्यासाठी सुमारे ५२.२१ कोटी, आसखेड फाटा ते करंजविहिरे या सुमारे ६.४५ किलोमीटरसाठी ३४.२३ कोटी, तर करंजविहिरे ते खिंड या २ किमीसाठी १०.८२ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आंबेठाण चौक ते करंजविहिरे-तळेगाव (आंबी) औद्योगिक वसाहत या रस्त्याने वसाहतीची अवजड वाहतूक होते. टप्पा दोन व तळेगाव वसाहतीस जोडणारा हाही एक रस्ता आहे, त्यामुळे रस्त्याच्या कुवतीपेक्षा जास्तीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर कित्येक ठिकाणी पूर्णपणे डांबररहित रस्ता तयार झाला. त्यामुळे नागरिकांना धूळ व गाड्याचे नुकसान, वेळेचा अपव्यय याचा त्रास सहन करावा लागला. परंतु आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर सदर रस्त्यास सुमारे ९७.२३ कोटी मंजूर झाले असले तरी यात रस्त्याच्या रुंदीकरणात येणाºया अडचणीवर विद्यमान आमदार व प्रशासन काय तोडगा काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.वाडा रस्त्यावर खड्डेवाडा : येथील गावातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहे. यामुळे येथून ये-जा करणाºया नागरिकांनायाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.येथील रस्त्यांचे काही वर्षांपूर्वी खडीकरणात झाले होते. त्यानंतर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीची मागणी करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांत या रस्त्याचे काम झालेले नाही. दरवर्षी पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील माती वाहून गेल्याने खडी मोठ्या प्रमाणात निघाली असून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणे