पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुलटेकडी येथील इंदिरानगर वसाहतीमध्ये ब्राऊनशुगरची विक्री करणाऱ्याला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल आठ लाख ७० हजार रुपयांचे १७४ ग्रॅम ब्राऊनशुगर जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.राहुल ऊर्फ खंड्या दत्तू आरणे (वय २६, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या साथीदार असलेल्या सुनीता श्रावण वायदंडे व स्नेहा मुकेश चव्हाण (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) या दोघींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी व सहायक निरीक्षक अजय वाघमारे हे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. त्या वेळी आरणे पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्याची झडती घेतली असता कागदामध्ये बांधलेल्या ९० पुड्या मिळाल्या. पोलिसांनी या पुड्या आणि त्याच्याकडील प्लॅस्टिकची पिशवी तपासली असता त्यामध्ये ब्राऊनशुगर असल्याचे दिसले. (प्रतिनिधी)
तब्बल ९ लाखांचे ब्राऊनशुगर जप्त
By admin | Updated: February 15, 2017 02:29 IST