जुन्नर बाजार समितीसाठी ९७ % मतदान

By Admin | Updated: September 16, 2015 02:45 IST2015-09-16T02:45:19+5:302015-09-16T02:45:19+5:30

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ११ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ९७ टक्के मतदान झाले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही

9 7% turnout for Junnar Bazar Samiti | जुन्नर बाजार समितीसाठी ९७ % मतदान

जुन्नर बाजार समितीसाठी ९७ % मतदान

जुन्नर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ११ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ९७ टक्के मतदान झाले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. रिंगणातील ४७ उमेदवारांचे नशीब मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.
३ हजार ८५६ मतदार असलेल्या या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघात सर्वसाधारण -७, महिला -२, इतर मागासप्रवर्ग -१, व्हीजेएनटी-१ अशा एकूण ११, ग्राम पंचायत मतदार संघात सर्वसाधारण -२, अनुसुचित जाती जमाती- १, आर्थिक दुर्बल घटक -१ अशा एकूण -४, व्यापारी मतदार संघ-२ व हमाल मापारी मतदार संघ-१ अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली आहे.
सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी १८,महिला प्रतिनिधी गटातील दोन जागांसाठी ४, इतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी २ तर विमुक्त जाती-भटक्याी जमाती गटातील एका जागेसाठी ३ उमेदवार तर ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी ७ ,अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठी ३,तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील एका जागेसाठी २ उमेदवार, व्यापारी मतदारसंघातील एका जागेसाठी ४ , तर हमाल-मापाडी मतदारसंघातील एका जागेसाठी २ उमेदवार असे एकूण ४७ उमेदवार निवडणुकीत उभे होते. व्यापारी -अडते मतदारसंघात १५३७ पैकी १४२८ मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९२.९० आहे. हमाल-मापारी मतदारसंघातून २७५ पैकी २७२ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९८.९१ आहे. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ८९७ पैकी ८९६ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.८८ आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून ११४७ पैकी ११०४ मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९६.२५ आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची व अस्तित्वाची केली. तीनही पॅनलचे कार्यकर्ते मतदान खेचण्यासाठी धडपड होते. मतदारांची बडदास्त ठेवली जात होती. महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. सोसायटी व ग्रामपंचायत गटांत चुरशीने मतदान झाले. (वार्ताहर)

Web Title: 9 7% turnout for Junnar Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.