शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Pune: ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.५२ टक्के मतदान; इच्छुकांच्या भवितव्याचा आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:00 IST

सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ८६ टक्के मतदान बारामती तालुक्यात झाले तर, सर्वांत कमी ७४ टक्के मतदान जुन्नर तालुक्यात झाले....

पुणे : जिल्ह्यात रविवारी झालेल्या १८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल ८०.५२ टक्के मतदान झाले, तर जागा रिक्त झालेल्या ३१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठीही भरघोस ७९.६८ टक्के मतदान झाले आहे. या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला अर्थात मतमोजणी सोमवारी (दि. ६) होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ८६ टक्के मतदान बारामती तालुक्यात झाले तर, सर्वांत कमी ७४ टक्के मतदान जुन्नर तालुक्यात झाले.

राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर केली होती. तर १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठीही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेनुसार २३१ ग्रामपंचायतींमधील २ हजार ४० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार होती. माघारीच्या मुदतीनंतर एकच अर्ज आल्याने ८४९ सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १८८ ग्रामपंचायतमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीतून निश्चित होणार आहे. तर, ४२ ग्रामपंचायतींमधील २०४ रिक्त जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, १०६ ठिकाणी एकही अर्ज आला नसल्याने ही पदे पुन्हा रिक्त राहणार आहेत. तर ६३ सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे ३१ ग्रामपंचायतींमधील ३५ सदस्यपदांसाठी रविवारी मतदान झाले.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत २३१ पैकी १८६ ठिकाणच्या निवडणुकांसाठी ७०८ केंद्रांवर रविवारी मतदान झाले. त्यासाठी तीन लाख ७९ हजार ६१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पोट निवडणुकीसाठी १४२ पैकी ३१ ग्रामपंचायतींसाठी १९ हजार ६१३ मतदारांनी हक्क बजावला. बारामती तालुक्यात मात्र पोटनिवडणूक घेण्यात आली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरा सांगण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

तालुका....... सार्वत्रिक निवडणूक ............पोटनिवडणूक

वेल्हे ..........८२.२४ .....................७३.०७

भोर ..........८३.५० ...............८४.५६

पुरंदर .............८३.३०...........८६.५९

दौंड ..................७८.८६ .............८३.७०

आंबेगाव............७५.२८.............७६.०८

खेड .............. ८२.२४...............७५.०३

शिरूर ...............८०.९४..............८४.९८

मावळ ...............८६.१८ ................८८.०५

हवेली ...................८१.७६...........८१.०७

बारामती ..............७३.९६....... निवडणूक नाही

इंदापूर ............. ७८.७८........८५.४९

मुळशी ...........८२.१८........७५.४९

जुन्नर ................७३.९६........७२.४७

एकूण ......... ८०.५२........७९.२८

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडgram panchayatग्राम पंचायत