शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पुणे स्टेशनवरुन अपहरण झालेल्या ८ महिन्याच्या मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 22:59 IST

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील ८ महिन्यांची मुलगी गौरी हिचा शोध लावण्यात सात दिवसांनी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून महिलेला अटक करण्यात आली आहे. 

पुणे  - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील ८ महिन्यांची मुलगी गौरी हिचा शोध लावण्यात सात दिवसांनी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून महिलेला अटक करण्यात आली आहे. 

अनुष्का रवींद्र रणपिसे (२९, रा़ वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळगाव रत्नागिरी ) असे या महिलेचे नाव आहे़  ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्ग्याजवळ सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्यादरम्यान घडली. मुल होत नसल्याने तिने मित्राच्या मदतीने हे बाळ पळविले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी लक्ष्मी गेनसिद्ध चाबुकस्वार (वय २८, रा़ अक्कलकोट) यांनी रेल्वे पोलिसांकडे फिर्याद दिली होती़  ती, तिचा पती व ८ महिन्यांची मुलगी गौरी असे तिघे ३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. दुसºया दिवशी त्यांनी हडपसर येथे एका ठिकाणी वाढपी म्हणून काम केले. राहायला जागा नसल्याने ते रेल्वे स्टेशनजवळील दर्ग्याजवळ थांबले होते. ५ फेब्रुवारीला त्यांना काही काम मिळाले नाही़ त्यामुळे पुन्हा गावी जावे, असा त्यांचा विचार होता़ त्या रात्री ते दर्ग्याजवळ थांबले असताना एक महिला तेथे आली, तिने त्यांची चौकशी केली़ मुलीसाठी कपडे दिले़ नंतर तिने आपल्या भाच्याला बोलावून घेतले.तुम्ही जेवण करून या मी मुलीला सांभाळते, असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून ते भाच्याबरोबर जेवायला गेले. मधूनच तो भाचा निघून गेला़ ते जेवण करून परत आले तर ती बाई व मुलगी तेथे नव्हते. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण ती कोठेच न सापडल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली़ तेव्हा स्टेशनसमोरील भुयारी मार्गातून ती मुलीला घेऊन जात असताना आढळून आली़  ही महिला अंदाजे ३० ते ३५ वर्षांची असून तिने निळ्या रंगाची साडी व ब्लाऊज घातला होता़ ती मराठीमधून बोलत होती़ 

या मुलीच्या शोधासाठी रेल्वे पोलीस तसेच पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी पथक एकत्रितपणे तपास करीत होते़ ही महिला वाल्हेकरवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने तेथे जाऊन सोमवारी सांयकाळी तिला पकडले व मुलीची सुटका केली़ अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत़ 

टॅग्स :Puneपुणे