शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पालघरमध्ये एकाच महिन्यात भूकंपाचे ८ धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 22:26 IST

भूगर्भातील हालचालीमुळे गेल्या एका महिन्यात पालघरमध्ये तब्बल ८ वेळा भूकंप जाणवला असून या भागात अशा प्रकारच्या हालचाली जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे वेधशाळेत या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत.

पुणे : भूगर्भातील हालचालीमुळे गेल्या एका महिन्यात पालघरमध्ये तब्बल ८ वेळा भूकंप जाणवला असून या भागात अशा प्रकारच्या हालचाली जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे वेधशाळेत या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत.गेल्या महिन्यात १० नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्याची रेश्टर स्केलवर त्यांची ३.२ इतकी नोंद झाली होती. त्यानंतर आजपर्यंत पालघरला एकूण ८ धक्के जाणवले. ते साधारण २.७ ते ३.३ रेश्टर स्केल इतक्याच्या तीव्रतेचे होते.  या भूकंपाचा केंद्रबिंदु डहाणू तालुक्यात असून ते जमिनीपासून सुमारे १० ते १३ किलोमीटर इतक्या खोलीवर आहे. पालघर हा भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये येत असला तरी या भागात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. याबाबत पुणे वेधशाळेतील भूकंप मापन केंद्राचे सहायक वैज्ञानिक धर्मपाल यांनी सांगितले की, इंडो आॅस्टेलियन प्लेटमध्ये होणा-या हालचालीमुळे असे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. हिमालयीन पर्वत रांगांमध्ये अशा प्रकारचे धक्के नेहमी जाणवतात. भूकंपाचे वर्गीकरण त्याच्या तीव्रतेवर करण्यात आले आहे. फेव्हर, सास्टेल, मॉडरेट, ग्रेट आणि बेरी ग्रेट अशा पाच प्रकारात वर्गीकरण केले जाते़ पालघरमध्ये जाणवणारे धक्के हे २़२ ते ४़९ रेक्टर स्केलमध्ये दुस-या प्रकारात मोडतात. पुणे वेधशाळेत वर्ल्डवाइल्ड सिसोग्राफ नेटवर्क उपकरण बसविण्यात आले आहे. देशातील ४ प्रमुख स्टेशनपैकी पुणे हे एक स्टेशन आहे. कुर्डवाडी येथूनही एक फ्लॉटलाईन जाते. त्यातील हालचालीमुळे परभणी, हिंगोली परिसरात भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. भुकंपाचे अनुमान अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकत नाही. जगात भूकंपाचा पूर्वअनुमान जाणून देणारी कोणतीही यंत्रणा अजून विकसित झालेली नाही, असे धर्मपाल यांनी सांगितले. पालघरमधील भूकंपदिनांक        वेळ    तीव्रता११ नोव्हेंबर    १८.२५    ३.२२४ नोव्हेंबर    १५.१५    ३.३२ डिसेंबर        १.३८    ३.१२ डिसेंबर        १.४८    २.९४ डिसेंबर        २१.२४    ३.२७ डिसेंबर        २२.१८    २.९१० डिसेंबर    ९.०४ २.८१० डिसेंबर     ९.०४    २.७

टॅग्स :palgharपालघर