शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रेनिमित्त ७२ विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:39 IST

आषाढी यात्रेनिमित्त विविध मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमिरज व पंढरपुर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमु सोडण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या 

पुणे :  पंढरपुर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातुर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहचेल. तर दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपुर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील. पंढरपुर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपुर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डुवाडी स्थानकातून पंढरपुरकडे प्रस्थान करेल.नवी अमरावती ते पंढरपुर अनारक्षित गाडीच्या चार फेऱ्या  होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी ११.१५ वाजता पंढरपुर येथे पोहचेल. तर पंढरपुर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. खामगाव ते पंढरपुर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता खामगाव स्थानकातून पंढरपुर कडे रवाना होईल. तर पढरपुर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातुर ते पंढरपुर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपुरकडे प्रस्थान करेल. तर त्याचदिवशी दुपारी २ वाजता पंढरपुर स्थानकातून सुटेल.मिरज व पंढरपुर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमु सोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता तर पंढरपुर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डुवाडी दरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमु गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रIndian Railwayभारतीय रेल्वेPandharpurपंढरपूर