शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सासवड मध्ये महसूल विभागाच्या छाप्यात ७१ गॅस सिलेंडर जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:57 IST

चंदन टेकडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे सिलेंडर असल्याची गोपनीय माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती.

सासवड: पुरवठा विभागातर्फे सासवड मधील चंदन टेकडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे साठविलेल्या घरगुती वापराचे ७१ सिलेंडर जप्त करण्यात आले. यावेळी ३५ भरलेल्या तर ३६ रिकामे गॅस सिलेंडर असा सुमारे १ लाख ३५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक सुधीर बबन बडदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत पोलिसांनी अवधूत महेश खोपडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदरचे तहसीलदार यांना सासवड मधील चंदन टेकडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर पणे साठविलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडर टाक्या असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पुरवठा निरीक्षक सुधीर बडदे यांच्यासह सासवडचे मंडलाधिकारी आर ए भामे, तलाठी बी एस ढमढेरे यांनी पंचासमक्ष प्रत्यक्षात त्या जागेवर जात पाहणी केली. त्यावेळी त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये गो गॅस कंपनीच्या सुमारे ७१ टाक्या आढळून आल्या. त्यावेळी तेथे असलेल्या अवधूत खोपडे याकडे अधिक माहिती विचारली असता याबाबत कोणतीही माहिती दिली नाही..मात्र , त्याच्याकडे गॅसचा साठा करण्याची परवानगी नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. ————————————————————यापूवीर्ही सासवडमध्ये अनधिकृतपणे साठा केलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होवून एक जण जखमी झाला होता. त्यावेळी तब्बल ४० हून अधिक बेकायदा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते. त्यामध्ये गॅस वितरकाचाच थेट संबंध आल्याने प्रकरण दडपण्यात आले. यानंतरही बेकायदा  गॅस सिलेंडर चा साठा व वितरण होत असून यापूर्वी महसूल पुरवठा विभागाला तक्रारी करून देखील कारवाई करण्यात येत नव्हती. निवडणूक काळातच अचानक सर्व प्रशासकीय यंत्रणा कशी काय सक्रिय होते. इतरवेळी का दुर्लक्ष होते हे सामान्य नागरिकांना न उलगडलेले कोडे आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरCylinderगॅस सिलेंडर