शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी खर्चमर्यादा ७० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 23:40 IST

लोकसभेच्या मावळ मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीचे अर्ज घेऊन जाण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली असून, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी इच्छुकांनी १४ अर्ज नेले आहेत. निवडणुकीचे प्रत्यक्ष कामकाज मंगळवारपासून सुरू झाले. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा सत्तर लाख असणार आहे.

लोकसभेच्या मावळ मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यानुसार ९ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारीअर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कविता द्विवेदी काम पाहत आहेत.

नामनिर्देशन पत्र घेऊन जाणे आणि दाखल करण्यासाठीची मुदत सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी १४ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. एकाही व्यक्तीने अर्ज दाखल केलेला नाही. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वळेत अर्ज दाखल करण्याची वेळ असणार आहे. तसेच शनिवार आणि रविवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. मुदतीनंतर दहा एप्रिलला छाननी होणार आहे. तर ११ व १२ ही माघारीची मुदत असणार आहे. त्यानंतर चिन्हवाटप होऊन प्रचार सुरू होणार आहे. १९८ प्रकारची चिन्हे निवडणुकीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी गौरी पवार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ७० लाख असणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारीअर्ज दाखल करताच एका दिवसातच उमेदवारांना राष्ट्रीयीकृत, तसेच सहकारी बॅँकेत खाते उघडणे बंधनकारक असणार आहे. बँक खात्याविषयी बॅँकांनाही निवडणूक विभागाने सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड