शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

''या'' जुन्या नव्या दिग्गजांच्या सुरावटीने सजणार सवाईचा स्वरयज्ञ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 20:28 IST

संगीत मार्तंड पं. जसराज, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम अशा दिग्गज कलावंतांसह संदीप भट्टाचार्य, मनोज केडिया व मोर मुकुट केडिया, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसकर व अनुजा बोरुडे, विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार अशा प्रथमच सादरीकरण करणाऱ्या प्रतिभावंत कलाकारांच्या अविष्कारांची मेजवानीने यंदाचा ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सजणार आहे. 

पुणे :  संगीत मार्तंड पं. जसराज, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम अशा दिग्गज कलावंतांसह संदीप भट्टाचार्य, मनोज केडिया व मोर मुकुट केडिया, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसकर व अनुजा बोरुडे, विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार अशा प्रथमच सादरीकरण करणाऱ्या प्रतिभावंत कलाकारांच्या अविष्कारांची मेजवानीने यंदाचा ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सजणार आहे. 

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यंदाच्या वर्षी ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ दि. ११ ते १५ डिसेंबरदरम्यान, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. महोत्सवात कला सादर करणारे कलाकार व  वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.          दि़ ११ ते १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० तर, चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. १४) दुपारी ४ ते रात्री १२ तसेच, शेवटच्या दिवशी रविवारी (दि. १५) महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत महोत्सवाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.बुधवारी (दि. ११) सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांचे गायन, जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन आणि  पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाने होणार आहे़           गुरुवारी (दि़ १२) दुसऱ्या दिवशी उस्ताद मशकुर अली खान यांचे शिष्य व किराणा घराण्याचे संदीप भट्टाचार्जी यांचे गायन, झारखंडचे केडिया बंधू म्हणून ओळखले जाणारे मनोज केडिया व मोर मुकट केडिया या बंधूंचे सरोद व सतार वादन व जयपूर घराण्याचे गायक वामनराव देशपांडे यांच्या शिष्या मंजिरी कर्वे -आलेगावकर यांचे गायन होणार आहे. पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने याची सांगता होणार आहे़शुक्रवारी (दि. १३) तिसऱ्या दिवशी ‘धृपद सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व पं. रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा यांच्या शिष्या अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर आणि अनुजा बोरुडे यांचे सादरीकरण होईल. यावेळी अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर यांचे धृपद गायन तर अनुजा बोरुडे यांचे पखवाज वादन, पं. भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे शिष्य व सुपुत्र विराज जोशी यांचे गायन, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य केन झुकरमन यांचे सरोदवादन होणार आहे. मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने समारोप होईल. रविवारी ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या स्वरांनी महोत्सवाची सांगता होईल. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकartकला