शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२२ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ६३ लीटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:09 IST

मावळसाठी पाठविण्यात आल्या ६३६४ बाटल्या

- विश्वास मोरे पिंपरी : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या ३ लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ६३६४ बाटल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पाठविण्यात आल्या आहेत. येथील २२ लाख २७ हजार ७३३ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार असून, अशा एकूण ६३.६ लीटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.मावळ लोकसभेसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग वेगवान होत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या असंख्य साहित्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई होय. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर निळी शाई लावण्यात येते. मावळमध्ये २२ लाख २७ हजार ७३३ मतदार आहेत. तसेच २५०४ मतदान केंद्र आहेत.पनवेलमध्ये ५८४, कर्जतमध्ये ३४३, उरणमध्ये ३३९, मावळमध्ये ३६९, चिंचवडमध्ये ४७०, पिंपरीत ३९९ बूथ आहेत. प्रत्येक बूथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. मतदारांच्या संख्येनुसारही शाईच्या बाटल्या किती लागतात हे अपेक्षित असते. एका बाटलीमध्ये १० मिली लिटर निळी शाई असते.एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांना निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाºया मतदाराच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र, २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले.कोणत्या बोटावर लागते शाईमतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.म्हैसूरची शाईसंपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी ख्याती या शाईची आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळ