शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देशात ६ महिन्यात ६३ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात; आफ्रिकी देशांमधून वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:38 IST

इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब या आखाती देशांबरोबरच आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश  बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे.

ठळक मुद्देएप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ६३ लाख टनांची तांदळाची विक्रमी निर्यातभारत थायलंड व विएतनाम या देशांना मागे टाकून तांदूळ निर्यातीत राहील जगात प्रथम क्रमांकावर

पुणे :  इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब या आखाती देशांबरोबरच आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश  बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या  सहा महिन्यांच्या कालावधीत भारताने ६३ लाख टनांची तांदळाची विक्रमी निर्यात केली आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही वित्तवर्षातील पहिल्या सहामहिन्यांचा हा उच्चांक आहे. जगात तांदळाची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या थायलंड व व्हिएतनाम या देशांच्या तांदळाच्या निर्यातीत भारताने गेल्या तीन वर्षापासून माग टाकले आहे.मागील वित्तवर्षात भारताने पहिल्या सहा महिन्यात तांदळाची ५५ लाख टन निर्यात केली होती. त्या तुलनेत या सहा महिन्यांची तांदळाची निर्यात १४% अधिक आहे. आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे. आफ्रिकी देशांशिवाय भारताच्या शेजारील नेपाळ व बांगलादेश या राष्ट्रांनी देखील गैर बासमती तांदळाची भारताकडून आयात वाढवली आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ या काळात भारताने गैर बासमती तांदळाची ४१.५० लाख टन निर्यात केली आहे, जी मागील वर्षाच्या ३५ लाख टनांच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक धवल शहा यांनी दिली.बासमती तांदळाच्या निर्यातीनेही एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. एप्रिल  ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत भारताने २१.५० लाख टनांची बासमती तांदळाची निर्यात केली आहे. आतापर्यंतच्या सर्व वित्तवर्षातील पहिल्या सहामाहीसाठी हा उच्चांक आहे. मिडल ईस्ट, अर्थात पश्चिम आशियायील आखाती देशांमध्ये बासमती तांदळाला खूप मागणी असते. भारताची बासमती तांदळाची ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताची बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती ह्या आखाती देशांना होते. इराणने यावर्षी बासमती तांदळाची आयात वाढवली आहे. त्याचबरोबर युरोपिअन महासंघातील देश व अमेरिका ही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहेत.मागील ३ वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा देश असून चालू वर्षीही भारत थायलंड व विएतनाम या देशांना मागे टाकून तांदूळ नियार्तीत जगात प्रथम क्रमांकावर राहील. या वर्षी निर्यात चांगली असल्यामुळे, गेल्यावर्षीच्या तुलनेत ११२१ बासमती व पारंपारिक बासमती भाताचे (धान) पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील दर १० ते १५ % जास्त निघाले.

भाताचे दर १० ते १५% उंच निघाल्यामुळे ११२१ बासमती व पारंपरिक बासमती तांदळाचे दरही आपल्या येथे मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५% जास्त राहतील. 

बासमती भाताचे (धान) सध्याचे दर रु. प्रती क्विंटल मध्ये:

वित्तवर्ष.     ११२१ बासमती.   पारंपरिक बासमती

२०१६-१७   ३००० ते ३२००.    ३७०० ते ४०००

२०१७-१८   ३२०० ते ३५००.   ४००० ते ४३००

 मध्यप्रदेश व गुजरात येथून नवीन तांदळाची आवक सुरु झालेली असून मार्केट मधील दर :

नवीन कोलम तांदूळ  : ३५ ते ४० रुपये  प्रती किलोनवीन लचकारी तांदूळ : ४० ते ४५ रुपये  प्रती किलो

टॅग्स :Puneपुणे