मोरगाव तसेच येथील वाडीवस्ती परिसरात दोन दिवसात सहा रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. सध्या लोक बेफिकिरपणे वागत असल्याने तालुक्यासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे . यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच विना मास्क व विनाकारण फिरणे हे धोक्याचे आहे. मोरगाव येथील खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करताना तत्काळ आजाराचे निदान होईल असे उपचार करण्याचे त्यांनी आवाहन केले. नागरिकांनी सर्दी, खोकला , ताप अंगावर न काढता तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा व कोरोनाचा धोका टाकळ्यासाठी मास्क वापरावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.
मोरगावमध्ये दोन दिवसांत ६ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST