शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 11:46 IST

अनेक कंपन्या राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला रामराम करणार

पुणे: वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी सुविधांचा अभाव यांच्यामुळे हिंजवडीमधील 56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. यामध्ये 6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर आता 56 कंपन्या हिंजवडीला रामराम करणार आहेत.राज्यातील सर्वात मोठं आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि राष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं हिंजवडीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आयटी पार्कला घरघर लागली आहे. ऑफिसला ये-जा करताना करावा लागणारा वाहतूक कोंडीचा सामना आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांच्यामुळे अनेक कंपन्या हिंजवडीतून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. हिंजवडीत कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तितकाच वेळ ऑफिसमधून घरी जाण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसातील किमान चार तास वाहतूक कोंडीत जातात. यामुळे अनेक कंपन्यांनी हिंजवडीला रामराम केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या बालेवाडी आणि खराडीत स्थलांतरित झाल्या. यानंतर आता आणखी सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतून काढता पाय घेतला आहे. तर आणखी 50 लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी आणि पुण्यातील अन्य भागांमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला घरघर लागली आहे.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञान