शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

धक्कादायक! जीव टांगणीला, तरी म्हणे ५४ टक्के अपंगत्व..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 11:13 AM

साध्या डोळ्यांना दिसत असतानाही आंधळेपणे दिले प्रमाणपत्र

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार समोर : औंध रुग्णालयाचा प्रताप डॉक्टरांनी तपासणी केलीच नाही ! ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून संबंधितांची तपासणी

विशाल शिर्के - पुणे : आठ वर्षांच्या मुलाला झालेल्या अतिदुर्मिळ आजारामुळे दोन्ही हात आणि पायांची बोटे जोडलेली... दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे मांडीला चिकटल्याने त्यावर झालेली शस्त्रक्रिया.. त्वचेला हात लावली तरी फाटेल अशी स्थिती... कायम जखमा वावरत असलेले शरीर... पायाने चालता येत नाही... हे वर्णन ऐकल्यानंतर कोणालाही संबंधित मुलाचे शंभर टक्के परावलंबित्व कळेल. मात्र, संबंधित मुलाची पाहणी केल्यानंतरही औंध रुग्णालयाने त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ५४ टक्के अपंगत्व असल्याची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तीव्र अपंगत्वाचे असलेल्या आर्थिक लाभापासून त्यांच्या कुटुंबीयांना वंचित राहावे लागत आहे. 

हर्षल मंगेश कदम (वय ८, रा. रामदासनगर, चिखली) या मुलाला दुर्मिळ एपिडर्मोलिसिस बुलोसा हा जन्मजात आजार झाला आहे. त्याची हातापायांची बोटे चिकटली असून, हात आणि पाय अगदी काडीसारखे आहेत. त्याला प्रत्यक्ष पाहणेही सामान्य माणसाला असह्य होईल, अशी स्थिती दिसत असतानाही डॉक्टरांनी (?) संबंधित मुलाचे निदान कमी अपंगत्व असलेले केले आहे. त्यास अवघे ५४ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र तपासणी (?) करून दिले आहे. संबंधित प्रमाणपत्र ३ जानेवारी २०१८ ला दिले असून, त्यावर डॉ. एस. व्ही. खिलारे, अतिरिक्त सिव्हील सर्जन आणि सिव्हील सर्जन डॉ. आर. के. शेळके यांची स्वाक्षरी आहे. रुग्णालयाच्या या प्रकारामुळे दिव्यांग क्षेत्रामधे संतापाची तीव्र लाट पसरली आहे. याबाबत माहिती देताना हर्षलचे वडील मंगेश कदम म्हणाले, ‘‘हर्षलला जन्मजातच हा आजार आहे. हा आजार दहा लाखांतून एकाला होत असल्याचे डॉक्टरांकडून समजले. सुरुवातीला त्याची बोटे चिकटलेली नव्हती. मात्र, या आजाराची तीव्रता वाढल्यानंतर ती चिकटली. त्याचे दोन्ही पाय मागे मांडीला चिकटलेले होते. त्यावर बेंगळुरु येथील मणिपाल हॉस्पिटलमधे शस्त्रक्रिया झाली. तो अजूनही चालू शकत नाही. त्याच्या या आजारामुळे सतत जखमा होत असतात. कपडे घासले तरी जखम होते. त्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दीड तास ड्रेसिंग करावे लागते. त्यासाठी विशेष ड्रेसिंग साहित्य लागते. त्यामुळे उपचारासाठी महिना ८ ते दहा हजार रुपयांचा खर्च होतो.’’....संबंधित डॉक्टरांवर कारवाई करा : राजेंद्र वाकचौरे 

* हर्षलला साध्या डोळ्यांनी पाहिले तरी त्याचे बहुविकलांगत्व लक्षात येते. डॉक्टरांनी प्रमाणपत्र देण्यापूर्वी तपासणी केली की नाही, हा प्रश्न पडतो. संबंधित मुलगा तीव्र अपंगत्व श्रेणीत मोडतो. तीव्र अपंगत्व असलेल्या व्यक्तीस बस, रेल्वे प्रवासात सवलत असून, तिच्या सोबतच्या व्यक्तींनाही या सवलतीचा फायदा घेता येतो. त्यासाठी ६५ टक्क्यांच्या वर अपंगत्व असणे आवश्यक आहे.......

* याशिवाय विविध सरकारी योजनांमधे या व्यक्तींना प्राधान्य मिळते. जिल्हा परिषदेच्या योजनेतून ६० टक्क्यांच्या वर अपंगत्व असल्यास संबंधित या व्यक्तीला महिना एक हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. अशा अनेक लाभांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. संबंधित मुलाच्या वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे.  

* मुलाच्या उपचारांसाठी वेळेबरोबरच पैसाही खर्च होतो. त्यांना केवळ अपंगत्वाचे प्रमाण कमी दिल्याने लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी केली आहे. ..........डॉक्टरांनी तपासणी केलीच नाही ! ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर एक व्यक्ती आली. ती व्यक्ती डॉक्टर होती की नाही, हे सांगता येत नाही. आम्हाला वाटले मुलाची तपासणी होईल. त्यांनी केवळ पाहून ५४ टक्क्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याचे हर्षलचे वडील मंगेश कदम यांनी सांगितले.  .....ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून संबंधितांची तपासणी केली जाते. त्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण ठरविले जाते. संबंधित प्रकरणी अस्थिशल्यचिकित्सकाला विचारण्यात येईल. - डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध 

टॅग्स :Aundhऔंधhospitalहॉस्पिटलDivyangदिव्यांग