शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

टनाला ५०० रुपये अनुदान द्यावे

By admin | Updated: January 19, 2015 23:25 IST

सध्या साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य झाले आहे.

बावडा : सध्या साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य झाले आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारने साखर कारखान्यांना प्रत्येक टनामागे ५०० रुपये अनुदान दिल्यास ते शक्य होईल, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ११ मेगावॉट क्षमतेचा सहवीज प्रकल्प कारखान्याच्या चालू गळीत हंगामात कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून उत्पादित झालेल्या १ कोटी ११ लाख ११ हजार १११ व्या वीज युनिट एक्स्पोर्टचे पूजन एनसीडीसी दिल्लीचे मुख्य संचालक ए. सर्वदेवा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, की साखर कारखानदारी टिकवायची आहे, पुढे न्यायची आहे. त्यामुळे ती उत्तम चालली पाहिजे. यावर शेतकऱ्यांचे संसार अवलंबून असून, उसाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात झपाट्याने निर्णय घेतले जायचे. दुर्दैवाने या सरकारच्या काळात आता तसे होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.सर्वदेवा म्हणाले, की या साखर कारखान्याने अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. हा वीज प्रकल्पही अतिशय थोड्या कालावधीत व बचत करून उत्कृष्टरीत्या राबविला आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या आणखीन नवीन प्रकल्पांना एनसीडीसी सदैव मदत करेल. कार्यकारी संचालक बी. बी. नवले यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष विलास वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. बारामती वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अशोक इरवाडकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दाणी यांची भाषणे झाली. या वेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तानाजी नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)४साखरेचे जर दर वाढणार नसतील, तर साखरेबरोबरच इतर उत्पादनांचा विचार कारखान्यांना करावा लागणार आहे. तरच ही कारखानदारी टिकू शकेल.४ आम्ही ब्राझील देशासह इतर साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून ‘बी हेवी’ मोलासेस उत्पादनाची माहिती घेत आहोत. ४हे प्रकल्प इतर देशांत यशस्वी झाले असून, त्याबाबत अभ्यास करून भविष्यात हा प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच हर्षवर्धन पाटील यांनी केले.४आघाडी सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात झपाट्याने निर्णय घेतले जायचे.