शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक खरेदीतही ५० कोटींचा ‘डल्ला’, एकही पुस्तक मिळाले नसताना कोषागारातून ३२ कोटी काढले

By नितीन चौधरी | Updated: December 22, 2022 07:37 IST

पुस्तकांवर किमतीऐवजी ‘नॉट फॉर सेल’

नितीन चौधरीपुणे : राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी विविध नियमांचा भंग करीत पुस्तक खरेदीत सुमारे ५० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यापैकी ३२ कोटींच्या पुस्तक खरेदीतील नियमभंगाचे पुरावे ‘लोकमत’कडे उपलब्ध असून, दुसऱ्या एका पुस्तक खरेदीत पुस्तकेच मिळालेली नाही, असे स्पष्टीकरण दोन सहायक आयुक्तांनी ‘लोकमत’ला दिले आहे. याबाबत समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी फोन न उचलल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही. सहायक आयुक्त कैलास आढे यांनी अशी पुस्तक खरेदी आपण केली नसून, ती पुण्यातूनच झाल्याचे सांगत फोन कट केला. पुण्याच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनीही  पुस्तके मिळाली नसल्याचे मान्य केले.  

पुस्तकांवर किमतीऐवजी ‘नॉट फॉर सेल’त्यानंतर सुमारे २४ दिवसांनी नारनवरे यांनी ३६ कोटींच्या पुस्तक खरेदीचे आदेश दिले. यासाठीही आढे यांनाच अधिकार दिले. या आदेशानुसार २१० पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी केवळ ११० पुस्तके खरेदी करण्यात आली. त्यापैकी एकाच प्रकाशकाची शेतीविषयक १०७ पुस्तके  आहेत. या पुस्तकांवर किंमत नसून  ‘नॉट फॉर सेल’ असे आहे. 

पैसे एकाच दिवसात : समाजकल्याण आयुक्तांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे व निवासी शाळांसाठी ३२ कोटी ३७ लाख रुपयांची पुस्तक खरेदी केली आहे. त्यासाठी नारनवरे यांनी १७ ऑक्टोबरला आदेश मंजूर केला. त्यानुसार सोलापूरचे सहायक आयुक्त कैलास आढे यांच्याकडे ही रक्कम वर्ग करून आढे यांनी महाकोषातून ही रक्कम एकाच दिवसात काढली. 

शेतीची पुस्तके का? समाजकल्याण आयुक्तांनी खरेदी केलेल्या ३६ कोटींच्या दुसऱ्या खरेदीत एकाच प्रकाशकाची शेतीविषयक १०७ पुस्तके खरेदी केली. वास्तविक समाजमंदिरांमधील ग्रंथालयात सामाजिक विषयांवरील पुस्तकांचा समावेश असायला हवा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपयोगाची पुस्तके मागासवर्गीय समाजमंदिरांमध्ये  काशासाठी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणे