कुंजीरवाडीत १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:34+5:302021-06-24T04:08:34+5:30

याप्रकरणी शिवराज काशीनाथ बक्के ( वय ३९, रा, मु. पो. उमरगा, डिग्गी रोड, मारुती मंदिराजवळ, उस्मानाबाद) याला अटक करण्यात ...

5 kg cannabis worth Rs 1 lakh 10 thousand seized in Kunjirwadi | कुंजीरवाडीत १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५ किलो गांजा जप्त

कुंजीरवाडीत १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५ किलो गांजा जप्त

Next

याप्रकरणी शिवराज काशीनाथ बक्के ( वय ३९, रा, मु. पो. उमरगा, डिग्गी रोड, मारुती मंदिराजवळ, उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार: अमली पदार्थ गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी परिमंडळ ४ व ५ कार्यक्षेत्रामध्ये पेट्रोलिंगकामी खांडेकर यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, साळुंखे हे मंगळवार (२२ जून) रोजी पुणे - सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मराठमोळा पान शॉप समोर आले होते.

तेथे बक्के हा हातामध्ये पांढऱ्या रंगाचे नायलॉन पोते घेऊन थांबलेला दिसला त्याच्या हालचाली पथकास संशयास्पद दिसून आल्या. त्याची पोलिसांची नजरा-नजर होताच तो तेथून घाईघाईने निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे पथकाला त्याचे जवळील पांढऱ्या नायलॉन पोत्यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला. त्याला दुपारी ४ - १५ वाजण्याच्या सुमारास जागीच पकडले.

बक्के जवळील पांढऱ्या नायलॉन पोत्याची गाठ न उघडता हाताने दाबून पाहिले असता, त्यामध्ये झाडपाल्यासारखा कोणतातरी पदार्थ असल्याचे जाणवले. त्यानंतर वास घेऊन पाहता, तो वास गांजासारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे त्या पोत्यामध्ये मध्ये गांजासारखा अमली पदार्थ असल्याचा संशय आलेने पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा बिया - बोंडासह हिरवट काळसर रंगाचा ओलसर गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. तो जप्त करून त्याचेवर एन. डी. पी. एस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला लोणी काळभोर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: 5 kg cannabis worth Rs 1 lakh 10 thousand seized in Kunjirwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.