चंदननगर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने चंदननगर शिवाजीमहाराज भाजी मंडईमधील शिवाजीमहाराज यांचा पुतळा दिव्यांनी सजविण्यात आला होता.४ हजार दिव्यांनी महाराजांच्या पुतळा परिसरात लखलखाट करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी रूपेश मोरे, स्वप्निल पठारे, पंकज दाणेकर, संतोष काळे, प्रयाग पठारे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
त्रिपुरारीनिमित्त ४ हजार दिव्यांची रोषणाई
By admin | Updated: November 16, 2016 03:14 IST