शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोना बाधित देशातून ४०० वर प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:40 IST

बाधित भागातून आलेल्या एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील

ठळक मुद्देचीन, दक्षिण कोरिया,जपान, नेपाळ,मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी १७२ प्रवाशांचा पाठपुरावा पुर्ण झाला असून ७३ प्रवासी देखरेखीखाली आहेत.

पुणे : कोरोना विषाणु बाधित देशांतून राज्यात आलेल्या प्रवाशांचा आकडा ४०० च्या पुढे गेला आहे. या प्रवाशांपैकी आतापर्यंत १५२ जणांना राज्यातील विविध रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील आहेत.

चीनमध्येकोरोना विषाणुचा उद्रेक झाल्यानंतर भारतात येणाऱ्या प्रवाशांची मुंबईसह अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. दि. ३ मार्चपर्यंत मुंबई विमानतळावर ५५१ विमानांमधील ६५ हजार ६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात बाधित भागातून ४०१ प्रवासी आले आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या प्रवाशांपैकी सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आढळल्याने प्रवाशांना राज्यातील विविध रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. आतापर्यंत १५२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९ जणांचे राष्ट्रीय विषाणु संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्यापैकी १४६ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

बाधित भागातून आलेल्या एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील आहेत. या प्रवाशांचा आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यापैकी १७२ प्रवाशांचा पाठपुरावा पुर्ण झाला असून ७३ प्रवासी देखरेखीखाली आहेत. तर ७२ प्रवाशांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून मंगळवारी केवळ एक संशयित प्रवासी रुग्णालयात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाchinaचीनJapanजपानAmericaअमेरिका