भोर : भोर तालुक्यातील किवत येथे ४ वर्षांच्या बालकाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, १० रोजी सकाळी ८ वाजता घडली. विघ्नेश अजित चव्हाण (वय ४) याचा मृत्यू झाला असून तो अंगणवाडीत शिक्षण घेत होता.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश सकाळी घराबाहेर लघुशंकेसाठी गेला असता त्याला काहीतरी चावले. काही वेळानंतर त्याला काहीतरी चावल्याचे लक्षात आल्यावर, त्याच्या कुटुंबातील आणि आजूबाजूच्या व्यक्तींनी त्याला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. विघ्नेशच्या मृत्यूने उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. यावेळी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण, रमेश पवार, सचिन पवार, योगेश कुमठे यांनी आक्रोशित महिला वर्गाचे सांत्वन केले. या छोट्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आजूबाजूच्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. गावात शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यू प्राथमिक अंदाजानुसार विषारी सर्पदंशामुळे झालेला आहे असे डॉक्टरांनी प्राथमिक माहितीत सांगितले, तरी वैद्यकीय अहवालानंतरच याची खात्री होणार आहे असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : A four-year-old boy from Kivat, Bhor, died from a snakebite. Vignesh Chavan was bitten outside his home and rushed to the hospital, but was declared dead on arrival. The tragic death has brought immense grief to his family and the community.
Web Summary : भोर के किवत में एक चार साल के बच्चे की सांप काटने से मौत हो गई। विघ्नेश चव्हाण को घर के बाहर सांप ने काटा और उसे अस्पताल ले जाया गया, लेकिन उसे मृत घोषित कर दिया गया। इस दुखद मौत से उनके परिवार और समुदाय में भारी शोक है।