शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वधूला उचलून नवदाम्पत्याने केल्या जेजुरी गडाच्या ३८० पायऱ्या सर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:08 IST

पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. 

ठळक मुद्देनवरदेवाने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर शेअर केली क्लिप वयाच्या विसाव्या वर्षापासून जिम्नशियमची आवड असल्याने हे शक्य : सूरज उंद्रे

मांजरी : लग्न झाले की दुसऱ्या दिवशी कुलदैवताच्या दर्शनासाठी नवरदेव व नवरी जात असतात. पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. घुले कुटुंबातील असलेली कन्या सायली व उंद्रे कुटुंबातील असलेला चिरंजीव सूरज यांचा विवाह नुकताच झाला. जेजुरी गडावर जात असताना पाच पायऱ्या नववधूला उचलून चालण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. परंतु नवरदेवाने नवरीला चक्क गडाच्या संपूर्ण ३८० पायऱ्या उचलून घेऊन सर केल्या. त्यामुळे जाता येणारे भाविक या नवदाम्पत्यांकडे पाहुन कौतुक करत होते. नवरदेवाने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर पूर्ण गड पार केलेली क्लिप शेअर केली आहे.सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांचे शरीरातील रचना स्थूलपणामुळे शरीर वाढलेले दिसते. त्यामुळे गड चढताना अनेकांना कसोटी करावी लागत आहे. अनेक लोक वेटलॉस (शरीराचे वजन कमी करण्यासाठी) डॉक्टरकडे, विविध प्रकारे आहारात डायटिंग करून संतुलित करताना दिसत आहे. एवढा गड वधूला घेऊन चढणे सोपी बाब नाही. परंतू वयाच्या विसाव्या वर्षापासून जिम्नशियमची आवड असल्याने हे त्याला शक्य झाले, असे सूरजने सांगितले. पाऊण तासात गड पार केला आणि तोही पाच दमात. गड चढल्यानंतर नवरदेवाचे हृदयाचे ठोके वाढले होते. दहा मिनिटे जागेवर थांबून विश्रांती घेतली व त्यानंतर भंडारा उधळून देवाचे दर्शन घेऊन खाली आलो, असे सूरज व सायली यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे