शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात ७५ जागांसाठी ३६३ जण भिडणार

By admin | Updated: February 14, 2017 01:52 IST

पुणे जिल्ह्यातील बंडोबांनी त्यांची तलवार म्यान केल्याने आणि नाराजांना मनवण्यात यश आल्याने पुणे जिल्ह्यातील निवडणुकीचे

पुणे : पुणे जिल्ह्यातील बंडोबांनी त्यांची तलवार म्यान केल्याने आणि नाराजांना मनवण्यात यश आल्याने पुणे जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ७५ गटांसाठी ३६३ इतके तर १५० जणांसाठी ६६५ इतके उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी होत आहेत. आजअखेरीस निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट झालेले असल्याने आता खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे. लक्षवेधी लढती कोणामध्ये राहतील हे देखील चित्र आता स्पष्ट झालेले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी गट, गण मिळून बहुसंख्य नाराजांना शांत करण्यात यश आले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चौरंगी व पंचरंगी निवडणुका रंगणार आहेत. बारामती तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक गटासाठी ३९ अर्ज तर पंचायत समिती गणासाठी ५५ अर्ज माघार घेतली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये सात गटांत ४७ जणांनी तर १४ गणांत ५३ जणांनी माघार घेतली आहे. गटामध्ये ६० उमेदवार व गणांमध्ये ६९ उमेदवार रिंगणात आहेत. दौंड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या ४ गटासाठी २५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ११ गणांसाठी ६५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक साळुंके यांनी दिली. खेड तालुक्यातून सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी एकूण ५२ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी २४ उमेदवार, तर पंचायत समितीच्या २१ गणांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. माघार घेणाऱ्यांत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल (बाबा) राक्षे, शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख विजया शिंदे, तिन्हेवाडीच्या सरपंच कविता पाचारणे यांचा समावेश आहे. हवेली तालुक्यात सर्वाधीक १८९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. १३ जिल्हा परिषद गटांसाठी ११५, तर पंचायत समितीच्या २६ गणांसाठी २१८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी जिल्हा परिषद गटांत ५२ जणांनी, तर पंचायत समिती गणांत ९२ जणांनी माघार घेतल्याने उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात ६३ व १२६ उतरले आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पेरणे, थेऊर, कोंढवे-धावडे या तीन गणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या गणांतील उमेदवारांची माघार व त्यांना चिन्हवाटप १५ फेब्रुवारी रोजी ११ ते ३ या वेळेत होणार आहे.जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १0८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ३९ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी १४ जागांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तबबल ५३ उमेदवारांची माघार झाली. पंचायत समितीच्या ३१ उमेदवारांनी माघार घेतली, तर जिल्हा परिषदेच्या २२ उमेदवारांनी माघार घेतलीमंचर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांमधून २९ उमेदवारांपैकी ५ जणांनी माघार घेतल्याने २४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे. पंचायत समितीच्या १० जागांतील ६४ उमेदवारांपैकी २४ जणांनी माघार घेतल्याने ४० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. माघारीनंतर चौरंगी लढत बहुतेक ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीच्या ६ जागांसाठी ३५ जण दाखल झाले होते. आज १२ जणांनी माघार घेतल्याने ६ जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज राहिले आहेत, तर जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी २३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज ११ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. एकूण ९ जागांसाठी ३५ अर्ज राहिले आहेत.४वेल्हा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ६ व पंचायत समितीसाठी ११ उमेदवारांनी सोमवारी अखेरच्या दिवशी माघार घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन गटांमध्ये १३ व पंचायत समितीच्या चार जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सासवडमध्ये जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी २७ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी एकूण ६३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता ३८ उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळशी तालुक्यात एकूण ४५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी १६, तर पंचायत समितीसाठी ३४ असे एकूण ५० जण रिंगणात उरले आहेत.चार जणांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या ६३ जणांनी आज अर्ज माघारी घेतले आहेत. ़कोळविहीरे- नीरा गटातून राष्ट्रवादीच्या सुजाता दगडे आणि कोळविहीरे गणातून राष्ट्रवादीचेच सुरेश जगताप यांनी बंडखोरी केलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पुरंदरच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजपा-मनसे अशी चौरंगी लढत होत़े़