शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून ३५३ अल्पवयीन मुले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आई-वडील रागविले, मित्राने लग्नाचे आमिष दाखवले, चांगल्या नोकरीचे आमिष दाखविले, घरात मनाप्रमाणे वागू देत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आई-वडील रागविले, मित्राने लग्नाचे आमिष दाखवले, चांगल्या नोकरीचे आमिष दाखविले, घरात मनाप्रमाणे वागू देत नाही, वडिलांकडून सतत मारहाण होते अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अल्पवयीन मुले-मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा पळून गेलेल्या लहान मुलांबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो. पुणे शहरातून गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर ३६३ मुले-मुली पळून गेली होती. त्यापैकी २५२ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

अनेकदा मुले छोट्या छोट्या कारणांवरून रागात घर सोडून जातात. बरेचदा काही वेळाने त्यांचा राग शांत झाल्यावर ती घरी परत येतात. मात्र, अनेक जण घरी परत न देता इतरत्र काम करून घरी परतत नाही. यंदा पाेलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन मुस्कानमध्ये १२ मुलांना शोधण्यात यश आले.

आईशी भांडल्याने सोडले घर...

पुणे रेल्वे स्टेशनवर एक १३ वर्षांची मुलगी एकटीच बसलेली पोलिसांना आढळून आली. त्यांनी चौकशी केल्यावर ती काहीच सांगत नव्हती. शेवटी महिला पोलिसांनी तिच्याशी गोड बोलून तिला सामाजिक सुरक्षा विभागात आणले. जेऊ घातले. त्यानंतर तिने घरातून निघून आल्याचे सांगितले. पण आईचा नंबर देण्यास तयार नव्हती. तुला कोण कोण भेटले, असे विचारले असताना पोलिसांच्या अगोदर तिला दोघे जण भेटले होते. त्यांनी मोबाईल नंबरही दिला होता. पण सुदैवाने ती त्यांच्या भुलथापांना बळी पडली नाही. शेवटी आईशी संपर्क साधून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.

......

लग्नाच्या आमिषाने पळविले

पश्चिम बंगालमधील एनजीओमार्फत अर्ज आला होता. लॉकडाऊनच्या काळात लोक घरात येऊन देत नसतानाही पोलिसांनी सतत दोन दिवस लोणी कंद परिसरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असल्याचे भासवून या मुलीचा शोध घेतला. तेव्हा ती मुलगी सापडली. या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले होते. तिला तो वेश्याव्यवसायात बुधवार पेठेत विकायच्या तयारीत होता. तेथे तिला घेऊन जाऊन दाखवून आणले होते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने ती बचावली होती.

---

नशेमुळे आला होता पळून

पश्चिम बंगालमधील एक १४ वर्षांच्या मुलाला नशेची सवय लागली होती. त्यातून तो पुण्यात आला होता. पोलीस उरूळी कांचन येथे कारवाईला जात असताना त्यांना हा मुलगा आढळून आला. पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. त्याचे वडील पुण्यात आल्यावर त्यांना गाडीखर्च देऊन मुलासह गावी परत पाठविले.

---

सामाजिक सुरक्षा विभागाने पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक श्रीधर खडके व पोलीस कर्मचारी राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, नीलम शिंदे, मनीषा पोकाळे, आश्विनी केकाण, रोहिणी जगताप, पुष्पेंद्र चव्हाण, शशांक खाडे, इरफान पठाण, हणमंत कांबळे यांनी ही कामगिरी केली.

२०१९, २०२० (नोव्हेंबरअखेर)

बेपत्ता मुले १८० ७५

बेपत्ता मुली ४६३ २८८

एकूण ७४३ ३६३

सापडले मुले १५६ ५८

सापडले मुली ३८४ १९४

एकूण सापडलेले ५४० २५२