शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

३४ लाख रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्यांना उत्तर प्रदेशात पकडले, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:12 PM

दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरून ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या आरोपींना नेपाळला पळून जात असताना त्यातील दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

पुणे : दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरून ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या आरोपींना नेपाळला पळून जात असताना त्यातील दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. सहा दिवसात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.केशर प्रेम साही (वय २३, रा. कुंदन इस्टेट, मूळ गाव नेपाळ) आणि कृष्णा ब्रिकबहादूर शाह (वय ३५, रा. नेपाळ) अशी त्यांची नाव आहेत़ त्यांचे साथीदार मुकेश सिंग (वय ३०), त्याची पत्नी पारो (वय २३) हे फरार आहेत. याप्रकरणी आशिष भवरलाल जैन (वय ३९, रा. कुंदन इस्टेट, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली होती.सहायक पोलीस आयुक्त समीश शेख यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वात या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने सुरु केला. ज्या ज्या मार्गानी नेपाळकडे जाण्याची शक्यता आहे. त्या त्या राज्यात तसेच भारत नेपाळ सीमेवर रवाना करण्यात आली. नेपाळकडे जाणारे रेल्वे मार्ग, रेल्वेची वेळापत्रके या ठिकाणांहून नेपाळच्या सीमेपर्यंत रस्ते मार्गे जाणा-या ट्रॅव्हल्स याचा बारकाईने अभ्यास करुन तांत्रिक विश्लेषण करुन गुन्ह्यातील आरोपी हे फरिदाबाद या मार्गे निघून जात असल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली येथून हे आरोपी गाझीयाबाद हायवे मार्गे नेपाळकडे जाण्याची शक्यता होती. सायबर गुन्हे शाखेचे पथक दिल्लीतच यावेळी होते. त्यांच्या मदतीने सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी नेपाळकडे जाणा-या ट्रॅव्हल्सचा पाठलाग करुन या गुन्ह्यातील दोन आरोपींना उत्तर प्रदेशातील हापुड परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ६ लाख ७१ हजार रुपये आणि १२ लाख २५ हजार रुपयांचे डायमंड असलेले सोन्याचे दागिने असा १८ लाख ९६ हजार १३९ रुपयांचा ऐवज जप्त केला.ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, मुरलीधर करपे, अंजूम बागवान, जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, अमोल भोसले, मदन कांबळे, सहायक फौजदार अरविंद चव्हाण, हवालदार असलम अत्तार, संतोष जाधव, मुथय्या, अनिल घाडगे, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार, माने, सागर तोरडमल यांच्या पथकाने केली.नोकरांचे चारित्र्य पडताळणी करणे आवश्यकनागरिकांनी त्यांचे घरात घरकाम करणारे नोकर तसेच वॉचमन म्हणून काम करणा-या प्रत्येक व्यक्तीची पूर्ण माहिती घेऊन स्वत:कडे ठेवावी व जवळच्या पोलीस ठाण्यामधून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.