शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलूप; शहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 04:59 IST

महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते.

पुणे : महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. परंतु, शहरातील ३३ अभ्यासिका सध्या बंद असून, मार्गदर्शक मिळत नसल्याने त्यांना कुलूप लावण्यात आल्याचे समाजविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील हजारो गरीब, मागासवर्गी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील गरीब व मागासवर्गीय इयत्ता ५वी ते इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरात महापालिकेच्या वतीने अभ्यासिका चालविल्या जातात. शहरातील वस्तीपातळीवरील समाजमंदिरे, महापालिकेच्या शाळांचे हॉल, वर्गखोल्या अभ्यासिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय, महापालिकेच्या वतीने शहरात १४२ ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर अभ्यासिका वर्ग घेण्यात येतात.यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मासिक मानधनावर डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते.सध्या केवळ १०९ अभ्यासिका सुरू आहेत; परंतु केवळ पात्र मार्गदर्शक मिळत नसल्याने शहरातील ३३ अभ्यासिकांना कुलूप लावल्याचे समोर आले आहे. नगरसेविका पल्लवी जावळे यांनी लेखी प्रश्न विचारले होते. यावर प्रशासनाने उत्तर दिले असून, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.अभ्यासासाठी जागा नसल्याने अडचणवस्तीपातळीवर घरातील वातावरणामुळे अभ्यासात अनेक अडचणी येतात. अनेक वेळा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची केवळ अभ्यासासाठी जागा नसल्याने अडचण होते. या गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मासागवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध भागांत कोट्यवधी रुपये खर्च करून अभ्यासिका बांधलेल्या आहेत, परंतु, सध्या ऐन परीक्षांच्या हंगामात या अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

टॅग्स :Puneपुणे