पुणे : शहरात बुधवारी ३१४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ९०७ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८ टक्के इतकी आहे.पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २१२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या २८७ इतकी आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ७२५ इतकी आहेत. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६९० इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ९ लाख ६८ हजार ११६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८२ हजार १८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७४ हजार ७७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ... पिंपरीत दिवसभरात १६३ जण पॉझिटिव्ह आढळलेपिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढू लागला आहे. तर कोरोनामुक्तांचा आलेख कमी झाला आहे. दिवसभरात १६३ जण पॉझिटिव्ह आढळले असून १२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने दोघांचा जणांचा बळी घेतला आहे. २ हजार २२६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
शहरात मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती, ही संख्या या आठवड्यात वाढू लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार २६८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ९१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६६६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या ५६८ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त होताहेत कमी कोरोनामुक्तांचा आलेख कमी झाला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ हजार ९२३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ हजार ३४८ वर पोहोचली आहे.