शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

चोरट्याकडून ३१ मोबाईल जप्त, गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 05:33 IST

गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केलेल्या चोरट्याकडून २ लाख ९६ हजार ६०० रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात आले. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातून मोबाईल शिताफीने चोरण्यात येत होता.

पुणे : गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केलेल्या चोरट्याकडून २ लाख ९६ हजार ६०० रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात आले. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातून मोबाईल शिताफीने चोरण्यात येत होता.अवेज परवेझ शेख (वय, १९, रा. संजीवनी हॉस्पिटलजवळ, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नाईक संदीप तळेकर यांना शेख चोरीचे मोबाईल विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला स्वारगेट एसटी स्थानकावरून अटक केले. त्याच्याकडून ६ मोबाईल मिळून आले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत अणखी २५ मोबाईल त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.स्वारगेट एसटी स्थानक, शिवाजीनगर आणि गाडीतळ, हडपसर येथून बसमध्ये चढणाºया प्रवाशांचे मोबाईल शेखने चोरले आहेत. त्याने चोरलेल्या मोबाईलपैकी हडपसर पोलीस ठाण्यात ४, शिवाजीनगर आणि स्वारगेट येथे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. उर्वरित २५ मोबाईल मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले असल्यास त्यांनी रेंजहिल्स रस्त्यावरील गुन्हे शाखा युनिट तीनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात शेख याने हे मोबाईल चोरले आहेत. त्याला व्हाईटनरचे व्यसन असून, तो सध्या काही काम-धंदा करीत नाही. या पूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल नसल्याचे डहाणे म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक