शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

न्यायालयातच अडकली ३०९ कोटींची थकबाकी

By admin | Updated: April 14, 2017 04:31 IST

देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयात फेऱ्या मारायला लावून मोबाईल कंपन्यांनी त्यांचा काही हजार कोटी रुपयांचा कर थकवला आहे. एकट्या पुणे महापालिकेचीच

पुणे : देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयात फेऱ्या मारायला लावून मोबाईल कंपन्यांनी त्यांचा काही हजार कोटी रुपयांचा कर थकवला आहे. एकट्या पुणे महापालिकेचीच या कंपन्यांकडे ३०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर वसूल करता येईल, असा निकाल दिल्यानंतरही सर्व कंपन्या एकत्रितपणे पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे महापालिकांचा हातात आलेला घास गेला आहे. येत्या २० एप्रिलला या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.महापालिका हद्दीत या कंपन्यांनी बांधलेल्या टॉवरवर महापालिका कर लावत असते. केंद्र सरकारच्या धोरणानुसार असा कर लावताच येणार नाही, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यावर त्यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. सुरुवातीला पुणे व अन्य काही महापालिकांच्या हद्दीत असलेल्या टॉवरसंबंधाने दाखल केलेल्या या दाव्यांना लवकरच सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन एकच स्वरूप दिले. त्यात बराच वेळ गेला. त्यानंतर तब्बल ३ वर्षे या दाव्याच्या फक्त तारखाच पडत होत्या.दावाच दाखल केल्यामुळे महापालिकांना या कंपन्यांकडून कसलीही वसुली करता येत नव्हती. तरीही पुणे महापालिकेने काही कंपन्यांकडून सुमारे ८० कोटी रुपयांची वसुली केली आहे. अन्य काही महापालिकांनीही याच प्रकारे काही कोटी रुपयांची वसुली केली. या काळात न्यायालयात सातत्याने तारखा पडत होत्या; निकाल मात्र काहीच लागत नव्हता. कंपन्यांनाही तेच हवे होते. त्यामुळे पुणे महापालिकेत तत्कालीन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कंपन्यांकडून करवसुली न करता त्यांचे टॉवर ज्यांच्या मिळकतीवर उभे केले आहेत, त्या मिळकतधारकांकडून कर वसूल करावा, अशी मागणी केली. त्याप्रमाणे घरमालकांना नोटिसाही पाठवण्यात आल्या; मात्र त्यांनी जागा भाडेतत्त्वावर देताना कराची बाजू कंपन्यांवर टाकली असल्याचे लेखी करारच महापालिकेला सादर केले.दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने या कंपन्यांकडून महापालिकेला करवसुली करता येईल, असा निकाल दिला. करवसुलीसाठी कंपन्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. काही कंपन्यांच्या टॉवरना सीलही ठोकले. मात्र, इतकी मोठी थकबाकी आम्हाला देता येणे शक्य नाही; मागील थकबाकी माफ करावी, अशी मागणी करणारी याचिका कंपन्यांनी पुन्हा एकत्रितपणे न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आता २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. (प्रतिनिधी)- टॉवर बांधण्यासाठी कंपन्यांना महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी न घेताच अनेक कंपन्यांनी टॉवर बांधले असल्याचेही अनेक महापालिकांच्या निदर्शनास आले आहे. यावरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. तो दंड जमा करून कंपन्यांनी कर मात्र थकवला आहे.