Ganesh Festival 2018: भोरच्या फडणीसवाड्यातील गणपतीची ३०० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:20 AM2018-09-13T01:20:02+5:302018-09-13T01:20:37+5:30

Ganesh Festival 2018: भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे.

300 years old tradition of Ganapati in Phadniswad of Bhor | Ganesh Festival 2018: भोरच्या फडणीसवाड्यातील गणपतीची ३०० वर्षांची परंपरा

Ganesh Festival 2018: भोरच्या फडणीसवाड्यातील गणपतीची ३०० वर्षांची परंपरा

googlenewsNext

भोर : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेला भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने सोहळ््याचा वापर करून गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिक एकच गर्दी करतात.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळापासून ३०० वर्षांपूर्वी व्यंकोजी फडणीस व चिंतामणी फडणीस यांनी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमीदरम्यान ५ दिवस अष्टविनायक गणपती उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. गणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी फडणीस अरुणकाका जोशी यांच्या घरून गणेशमूर्ती सजवलेल्या पालखीतून वाजतगाजत फडणीसवाड्यात आणून प्रतिष्ठापना करतात. गणपतीला दररोज एक हजार दुर्वा वाहतात. त्यानंतर दुपारी ११ ते १२.३० दरम्यान जन्मकाळाचे कीर्तन व नंतर गणेशाला पाळण्यात ठेवून पाळण्याची दोरी ओढून गणेशजन्म सोहळा साजरा केला जातो. त्यानंतर गणेश पुराणवाचन, कीर्तन, प्रवचन झाल्यावर रात्री धूपारती व हरिकीर्तन केले जाते.
फडणीस यांच्या वाड्यात सागवानी लाकडाचा शिवकालीन देव्हारा असून त्यात यमाईदेवीची लाकडी मूर्ती असून गणपतीची एक मूर्ती पितळी व एक तांब्याची आहे. गणेश प्राणप्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी लळिताचे कीर्तन असून त्याचा प्रसाद रात्री दिला जातो.
अशा पद्धतीने गणेश जन्मोत्सव
संपूर्ण राज्यात भोर येथील फडणीसवाड्यात फडणीस व शनिवारवाड्यात पेशवे आणि मुजुमदारवाड्यात मुजुमदार मागील ३०० वर्षांपासून अखंडपणे साजरे केले जात असल्याचे प्रमोद फडणीस
यांनी सांगितले.
शिवाजीमहाराजांच्या काळात विचित्रगड संस्थानात कोषागार होते. त्याचे कार्यक्षेत्र महाबळेश्वरपासून ते सुधागड, पालीपर्यंत कारभार होता. त्याचा सारा वसूल करण्याचे काम फडणीसांचे वंशज शिवाजीमहाराजांकडे करीत होते. त्यांचे पूर्वीचे नाव लोहकरे होते. मात्र महाराजांनी त्यांना फडणीस ही पदवी दिल्याने तेव्हापासून त्यांना फडणीस म्हणून ओळखू लागले. भोरचे राजे पंतसचिव पूर्वी आंबवडे
गावात व फडणीस चिखलावडे
गावात राहत
होते. पंतसचिवांबोबर फडणीसही
भोरला राहायला आले. मात्र चिखलावडे गावात आजही त्यांचे गणेश मंदिर आहे. भोर येथील फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सवाला वेल्हे कोषागारातून २७ रुपये अनुदान मिळत होते, तर रोषणाईचे साहित्य भोरचे राजे पतंसचिव देत असत आणि पंतसचिव सर्व लवाजम्यासह गणेशजन्मकाळाच्या
कीर्तनाला स्वत: हजेरी लावत असत, मात्र संस्थाने खालसा झाली आणि पुढे ही परंपरा बंद झाली असली तरी मागील ३०० वर्षे अखंडपणे फडणीसवाड्यात व्यंकटेश रामचंद्र फडणीस,
त्यांचे पुतणे प्रमोद फडणीस ही दोन कुटुंबे सर्व खर्च करून आपली परंपरा आजही कायम
ठेवली आहे.

Web Title: 300 years old tradition of Ganapati in Phadniswad of Bhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.