शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल चोरट्यांकडून ३०० कोटींवर डल्ला , ५७ हजारांवर नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:06 IST

वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.

-विशाल शिर्केपुणे : वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.ई-अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारकडून चालना देण्यात येत आहे. मात्र, त्या प्रमाणात क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे होणाºया व्यवहारांची सुरक्षितता तितकीशी वाढली नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे केंद्रीय माहिती अधिकारी व्ही. जी. शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत तब्बल ५७ हजार ४११ नागरिकांना फसविण्यात आले. तब्बल २९० कोटी ३४ लाख ७२ हजार रुपये नागरिकांच्या खात्यातून चोरट्यांच्या खिशात गेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे. स्किमर लावून डेबिट कार्डचे क्लोन करणे, क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून पैसे लांबविणे अशा घटनांचा समावेश आहे.कार्ड फसवणुकीच्या घटनाई-व्यवहारांची सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आधार जोडणीमुळे खातेदाराच्या बोटांच्या ठशांसह संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. कार्डद्वारे होणाºया व्यवहारांत खातेदाराचे ठसे, तसेच खातेदाराच्या मोबाइल क्रमांकावरील गोपनीय क्रमांक ग्राह्य धरला जावा.- विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमcrimeगुन्हे