शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

गडप होण्याची ३० गावांना भीती

By admin | Updated: August 1, 2014 05:36 IST

मावळात दरवर्षी धो धो पाऊस कोसळतो. लाल मातीच्या डोंगरावरून खळखळ पाणी वाहते. या पावसात आणि अशा धबधब्यात भिजायला सारेजण धावतात..

सुभाष भांडे, कामशेतमावळात दरवर्षी धो धो पाऊस कोसळतो. लाल मातीच्या डोंगरावरून खळखळ पाणी वाहते. या पावसात आणि अशा धबधब्यात भिजायला सारेजण धावतात...आता काही वर्षांपासून डोंगरच विकत घेऊन धनिकांनी मोठ मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. परंतू, हे प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी असलेली ३० गावे ‘गडप’ करू शकतात. आपलीही स्थिती ‘मळीण’ सारखी होऊ शकते अशा भीतीने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.मावळच्या तीनही मावळापैकी पवन मावळात शिळीम, कादव, तुंग, तिकोणा, चावसर, पुसाणे, बऊर, नाणेमावळातील नेसावे, वेहेरगाव, शिलाटणे, वाकसई, मोरमारेवाडी, पाले, करंजगाव, जांभवली, साई, आंदरमावळातील कुसूर मोरमारेवाडी, दवणेवाडी, नवलाख उंब्रे, निगडे, वडेश्वर, फळणे, पारिंठेवाडी, किवळे, कशाळ, भोयरे, माऊ, कुसवली या गावांना धोका आहे. या गावांना लागूनच मोठ मोठ डोंगर आहेत. किवळे, पाले, नाणे या गावांतून डोंगरावर जाण्यासाठी इनरकॉन या खासगी पवन विद्युत कंपनीने रस्ते तयार केले आहेत. त्यातून हजारो झाडांची कत्तल झाली आहे. नैसर्गिक ओढे, नाले, ओहोळ यांच्या दिशा बदलल्या आहेत. पाले, करंजगावच्या डोंगरावर खासगी बंगले उभारण्यात आल्याने तेथेही रस्ते बनले आहे. कादव, शिळीम, वाघेश्वर, तुंग, चावसर, तिकोणा, लोहगड या किल्यांखाली मोठ मोठी हॉटेल, रिसॉर्ट उभारले आहेत. यामुळे या भागात अधून मधून मातीची ढासळ होते. डोंगराच्या कडांना भेगा पडतात. अर्धवट तुटलेले कडेही या गावांना धोकादायक आहेत. या गावांत बहुसंख्य लोक आदिवासी व धनगर जमातीचे आहेत. काहींनी पूर्वीपासून थेट डोंगरावर घरे उभारली आहेत. डोंगर ढासळला अथवा कडा कोसळल्यास डोंगरावरील राहणाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते.