शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! एकाच दिवशी तीस हजार पर्यटकांनी दिली सिंहगडाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 19:44 IST

तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कमालिची वाढ झाली आहे.

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शाैर्य गाथेवर आधारलेला 'तान्हाजी' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिंहगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. प्रजासत्ताकदिनी तब्बल 30 हजार पर्यटकांनी सिंहगडाला भेट दिली. सकाळी 10 वाजताच गडावरील पार्किंग फुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. 

पुणेकर आणि देशभरातील पर्यटकांसाठी सिंहगड नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विकेंडला सिंहगडावर गर्दी हाेत असते. अनेकदा घाटात माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी देखील हाेत असते. नुकताच अजय देवगण यांची प्रमुख भुमिका असलेला 'तान्हाजी' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सिंहगडची लढाई आणि तानाजी मालुसरे यांची शाैर्यगाथा दाखविण्यात आली आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिंहगड पाहण्याचे तसेच ज्या ठिकाणावरुन तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावरुन चढाई केली हाेती ताे कडा पाहण्याची माेठी उत्सुकता पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आता सिंहगडावर वळत आहेत. 

प्रजासत्ताकदिनी राज्यातून तसेच देशभरातून हजाराे पर्यटकांनी सिंहगडला भेट दिली. या एकाच दिवसात तब्बल तीस हजाराहून अधिक पर्यटक सिंहगडावर आले हाेते. सकाळी 10 वाजताच सिंहगडावरील पार्किंग फुल झाले हाेते. संपूर्ण सिंहगड घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. दिवसभर पर्यटकांची गर्दी सिंहगडावर हाेती. वाहनांची संख्या माेठ्याप्रमाणावर वाढल्याने वनपाल बाळासाहेब जिवडे यांनी काेंडी साेडविण्यासाठी उपद्रवशुल्क नाक्यावर वाहतूक थांबवून ठेवत टप्प्याटप्याने वाहने गडावर साेडली. 

पर्यटकांनी तानाजी मालुसरे जाे 'द्राेणगिरीचा कडा' चढून सिंहगडावर आले त्या कड्याची माहिती घेतली. तसेच त्यांच्या समाधी स्थळी नतमस्तक हाेऊन त्यांना मानाचा मुजरा देखील केला. पर्यटकांमध्ये सिंहगडची लढाई हाच चर्चेचा विषय हाेता. कोळीवाड्यातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी होउन गनिमी काव्याच्या माध्यमातून तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांसह आमावसेच्या काळोखात गड चढले हाेते. तो कोळीवाडा देखील पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता होती.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणेtourismपर्यटनTanaji Movieतानाजी