शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव येथून लवकरच ३० नवीन विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 18:47 IST

मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा आकडा सुमारे ८५ लाखांच्या पुढे गेला आहे.

ठळक मुद्देसध्या विमानतळावरून दररोज सुमारे २०० विमानांचे उड्डाण२८ आॅक्टोबरपासून पुढील सहा-सात महिन्यात अन्य ठिकाणी सेवा सुरू केल्या जाणार

पुणे : विमान प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पुण्यातून देशभरात विविध ठिकाणी जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे लोहगावविमानतळ प्रशासनाने ३० नवीन विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पुणे शहर आणखी काही शहरांना विमानसेवेद्वारे थेट जोडले जाणार आहे.मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा आकडा सुमारे ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. पुढील वर्षभरात सुमारे १ कोटींच्या पुढे ही संख्या जाईल असा विमानतळ प्रशासनाचा अंदाज आहे. सध्या विमानतळावरून दररोज सुमारे २०० विमानांचे उड्डाण होते. मागील वर्षभरात त्यामध्ये सुमारे ४० विमानसेवांची भर पडली आहे. आयटी हब असलेल्या पुणे शहरामध्ये देशातील विविध शहरांमधून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी नोकरदार, व्यावसायिक, उद्योजकांकडून विमानसेवेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विविध शहरांसाठी ही सेवा सुरू करण्याची मागणी असते. यापार्श्वभुमीवर विमानतळ प्रशासनाने ३० विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. याला विमानतळ संचालक अजय कुमार यांनीही दुजोरा दिला. २८ आॅक्टोबरपासून नवीन सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यानंतर याबाबतची सविस्तर माहिती दिली जाईल, असे अजय कुमार यांनी सांगितले. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  १ आॅगस्टपासून पुण्यातून रायपुर आणि हैद्राबादसाठी तर सप्टेंबरमध्ये गोव्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. जेट एअरवेज कंपनीकडून रायपुरसाठी आठवड्यातून दोनदा विमानसेवा पुरविली जाईल. तर स्पाईसजेटचे विमान दररोज हैद्राबादसाठी उड्डाण करेल. त्यानंतर २८ आॅक्टोबरपासून पुढील सहा-सात महिन्यात अन्य ठिकाणी सेवा सुरू केल्या जातील. 

टॅग्स :LohgaonलोहगावAirportविमानतळairplaneविमान