शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर ३ किलो १५९ ग्रॅम सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:59 IST

लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करुन आणलेले एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पुणे, दि. 11 - लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करुन आणलेले एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दुबईहून आलेल्या एका व्यक्तीच्या तपासणीत प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात कच्चे सोने लपवून आणले होते. बॅगेच्या तळाशी असलेल्या लाईनमध्ये सोन्याची वायर, तर ईमर्जन्सी एलईडी लाईट उपकरणात ७ बिस्कीट आणि डिजिटल अ‍ॅम्पलिफायरमध्ये ५९ गोल्ड प्लेट लपवून आणल्या होत्या. तसेच, मुबंई येथे वास्तव्यास असलेला एक साथीदार विमानतळाच्या बाहेर, वाट पाहत उभा होता. त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष दूदपुरी यांनी ही माहिती दिली. सोने तस्करीत भटकळ गाव सातत्याने समोर येत आहे. या पूर्वी देखील लोहगाव विमानतळावरुन ऑक्टोबर २०११ मध्ये येथील नूर मोईनुद्दीन बाप्पा याला अटक केले होते. भटकळ गाव आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे केंद्र झाले असल्याचा संशय तपास अधिका-यांना आहे. या तस्करीच्या साखळीत काही कापड व्यवसायिक देखील गुंतले असल्याचा तपास अधिका-यांना दाट संशय आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा