शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावात रंगणार २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन; ‘समाजभान’ देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:59 IST

शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे  मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात कार्यक्रमांचे आयोजन सूत्रसंचालनापासून मुलाखती, परिचय यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी संवादक घेणार पुढाकार

पुणे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे खडतर आयुष्य, त्यांचा जीवनसंघर्ष याबद्दलचे हृदयस्पर्शी मनोगत त्याच मुलांकडून ऐकताना समाजातील विदारक परिस्थितीची कल्पना येते. या परिस्थितीची लहान मुलांना जाणीव व्हावी आणि समाजभान जपण्याची सवय लागावी, यासाठी आगामी बालकुमार साहित्य संमेलनाचा हातभार लागणार आहे. मुलांचे हृदयस्पर्शी मनोगत आणि व्यवस्थेला त्यांनी विचारलेले प्रश्न उपस्थित केले जाणार असून, त्यांच्यासाठी निधी उभा केला जाणार आहे. संमेलन म्हणजे एक उत्सव न राहता बालकुमारांना योग्य वयात समाजभान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे  मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, पदाधिकारी माधव राजगुरू, सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी स्वागताध्यक्ष हरीश भारदे व संयोजक संस्थेचे प्रा. रमेश भारदे, उमेश घेवरीकर, भाऊसाहेब शिंदे उपस्थित होते. संमेलनात कथाकथन, कवितांचा सांगीतिक कार्यक्रम, मुलाखत, बहारदार गाण्यांची मैफिल, कार्यशाळा, चित्र व कवितांचे प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. समारोपसत्रात ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, मानसी सांडसे, शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले उपस्थित राहणार आहेत. संमेलनानिमित्त आयोजित राज्यस्तर कथा-कवितालेखन स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण व पारितोषिक वितरण होणार आहे. संमेलनातील सूत्रसंचालनापासून मुलाखती, परिचय यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी संवादक पुढाकार घेणार आहेत. 

बालसाहित्यिक मुलांशी संवाद साधणार साहित्यिक ल. म. कडू यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनात बालकुमारांना बहारदार कार्यक्रम तसेच नामवंत बालसाहित्यिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ग्रंथदिंडी, मिरवणूक, ग्रंथप्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात साहित्यिक मंदार भारदे व दीपक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. नगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे व जयंत येलूलकर, अनिरुद्ध देवचक्के प्रमुख पाहुणे असतील. बाल आनंद मेळाव्यात बालसाहित्यिक मुलांशी संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेShevgaonशेवगाव