शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘ते’ झाड होते म्हणून वाचले २७ प्रवाशांचे प्राण, चालकाविना बस चालली ८०० मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 18:48 IST

काळजाचा ठोका चुकविणारा हा क्षण प्रवाशांनी शनिवारी (दि.७ एप्रिल) पहाटे मंचर जवळील भोरवाडी येथे अनुभवला. 

ठळक मुद्दे झाड व बसमध्ये थोडेच अंतर राहिले होते.

मंचर : नाशिक-पुणे ही शिवशाही एसटी बस २७ प्रवाशांना घेऊन निघालेली होती. भोरवाडीजवळ बस रस्ता दुभाजकाला धडकल्याने चालक बाहेर फेकला गेला. त्यानंतर ही बस चालकाविना तब्बल ८०० मीटर अंतरावर जावून एका झाडाजवळ थांबली. दरम्यान, चालक जाग्यावर नसल्याचे पाहून एका प्रवाशाने उडी मारल्याने तो जखमी झाला. इतर सर्व प्रवाशी सुखरुप आहे. मात्र, काळजाचा ठोका चुकविणारा हा क्षण प्रवाशांनी शनिवारी (दि.७ एप्रिल) पहाटे मंचर जवळील भोरवाडी येथे अनुभवला. पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस सुसाट चालताना दिसतात. या बस आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेत आहे. तसेच प्रवाशांना या बसमधून प्रवास करण्याची उत्सुकता निर्माण करत आहे. परंतु, शनिवारी नाशिक आगाराची शिवशाही एसटी बस (एमएच.०६. बी.डब्ल्यू. ०६४७ ) ही २७ प्रवाशांना घेवून नाशिक येथून पुण्याला येत होती. बसने मंचर सोडल्यानंतर ती भोरवाडी जवळील पुलावर आली. येथून पुढे खेड-सिन्नर चौपदरी रस्ता सुरु होतो. ये- जा करण्यासाठी दोन स्वतंत्र रस्ते असून मध्ये दुभाजक आहे. नवीन चालकांना रस्ता लगेच समजून येत नाही. शिवाय चौपदरी रस्त्यावर प्रवेश करताना जागा अरुंद आहे. द्रुतगती रस्त्यावर शिवशाही बसने प्रवेश करताच रस्ता दुभाजकाला बसची धडक बसली. धडकेने चालक मोहन भिसे यांचा ताबा सुटून भिसे एसटी बाहेर फेकले गेले. मग चालकाविना असलेली एस.टी. बस पूर्वेला वळली. बसने पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका ढाब्याच्या इमारतीला किंचित धक्का दिला. त्यानंतर अनेक अडथळे पार करत ही बस पुढे गेली. या दरम्यान बसमधील प्रवाशांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला. त्यांनी आरडा ओरडा केला. या दरम्यान गाडीतील एक प्रवाशी निलेश वाघ (रा.नाशिक) हे काय झाले पाहण्यासाठी चालकाजवळ गेले तेव्हा त्यांना चालक जाग्यावर नसल्याचे दिसले. घाबरलेले वाघ यांनी चालत्या गाडीतून उडी टाकल्याने ते जखमी झाले आहे. महामार्गापासून तब्बल ८०० फूट अंतरावर जावून शिवशाही बस एका  झाडाजवळ जावून थांबली. विशेष म्हणजे झाड व बसमध्ये थोडेच अंतर राहिले होते. या अपघातात आतील प्रवासी सुरक्षित राहिले आहेत. चालक भिसे व घाबरुन उडी मारलेले निलेश वाघ हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एसटीचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुणे-नाशिक महामार्गालगतच्या शेतातून शिवशाही बस ८०० फूट चालकाविना पुढे गेली. बस ज्या मार्गाने गेली तेथे एखादी विहीर, घर अथवा भिंत असती तर मोठी दुर्घटना घडली असती. खेड-सिन्नर बाह्यवळण रस्त्याचे काम अपुर्ण आहे. या भागात नेहमीच अपघात होत असतात. त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :MancharमंचरAccidentअपघातBus Driverबसचालक